Nashik Crime News | नाशिकमध्ये शेततळ्यात बुडून 12 वीच्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – Nashik Crime News | नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील सुराणे या ठिकणी 12 वीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Nashik Crime News)

काय आहे नेमके प्रकरण?
हरीश सुधाकर देवरे (वय 19 वर्षे ) असे मृत पावलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. तो शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास शेततळ्याजवळ काम करत होता. यादरम्यान त्याचा अचानक तोल गेला आणि तो शेततळ्यात पडला. हरीशला पोहता येत नसल्यामुळे त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच हरीशच्या कुटुंबीयांनी आणि शेजारच्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याला तातडीने पाण्यातून बाहेर काढून नामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. (Nashik Crime News)

हरीशचा स्वभाव हा मनमिळाऊ होता. हरीश हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. सध्या हरीशची बारावीची परीक्षा होती. तो आपला अभ्यास सांभाळत कुटुंबाला हातभार लावत होता. त्याने खूप शिकून कुटुंबाचे नाव रोशन करण्याचे स्वप्न मनाशी बाळगले होते मात्र त्या अगोदरच नियतीने घात केला. या घटनेमुळे देवरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हरीशच्या पश्चात आई, वडील आणि बहीण असा परिवार आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title :-  Nashik Crime News | unfortunate death of 12th student harish deore in surane village nashik

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sangli Crime News | ओडिशामधून सांगलीत गांजा तस्करी करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे पथकाकडून कडक कारवाई

Pune Pimpri Chinchwad Crime | MSEB मधून बोलत असल्याचे भासवून पावणे दोन लाखांची ऑनलाइन फसवणूक, भोसरी मधील प्रकार

Ramdas Kadam | उद्धव ठाकरेंच्या सभेआधी रामदास कदमांचा इशारा, म्हणाले-‘… तर मानहानीचा दावा ठोकणार’