Nashik Crime | धक्कादायक ! पोलीस कर्मचाऱ्याचा पत्नीसह सासू-सासऱ्यावर खुनी हल्ला, सासऱ्याचा जागीच मृत्यू; नाशिकमध्ये खळबळ

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – Nashik Crime | एका पोलीस कर्मचाऱ्याने (police Officer) पत्नी (Wife), सासू (Mother in Law), सासऱ्यावर (Father in Law) चाकूने सपासप वार (Knife Attack) केल्याची घटना नाशिक जिल्ह्यातील (Nashik Crime) सिन्नर तालुक्यात घडली आहे. या घटनेत सासऱ्याचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू (Dead) झाला तर पत्नी आणि सासू गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  वावी पोलीस ठाण्यात (Wavi Police Station) आरोपी सुरज उगलमुगले (Suraj Ugalmugale) याच्यावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या (Nashik Crime)  सिन्नर तालुक्यातील (Sinnar Taluka) वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. सुरज उगलमुगले असे आरोपीचे नाव आहे. सुरज उगलमुगले याच्याविरोधात यापूर्वी पत्नीने शहर हद्दीत असलेल्या उपनगर पोलीस ठाण्यात (Upnagar Police Station) तक्रार दिली होती. सुरज हा जुगार (Gambling) आणि सट्टा खेळण्याच्या (Betting) आहारी गेला होता. त्यामुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज झाले होते. त्यामुळे तो वारंवार सासऱ्याकडे पैशांची मागणी करत होता. आज देखील त्याने पत्नीकडे पैशाची मागणी केली. मात्र तिने घरुन पैसे आणण्यास नकार दिला. पत्नीने पैशाला नकार दिल्याने आरोपीने चाकू घेऊन सासरी आला होता. त्यानंतर त्याने पत्नी, सासू आणि सासऱ्यावर हल्ला केल्याचे नातेवाईक सांगत आहेत.

आरोपीने रागाच्या भरात पत्नीवर चाकूने हल्ला केला. मुलीला वाचवण्यासाठी वडील निवृत्ती सांगळे (Nivrutti Sangale) पुढे आले.
आरोपीने त्यांच्यावरही चाकूने सपासप वार केले.
तसेच सासू शिला सांगळे (Shila Sangale) यांनी मध्यस्थी केली असता त्यांच्यावरही वार केले.
या हल्ल्यात सासरे निवृत्ती सांगळे यांचा मृत्यू झाला तर पत्नी पूजा आणि सासू शिला सांगळे हे जखमी झाले.
चाकूने वार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन पळून गेला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

 

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचानामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला.
दरम्यान, आरोपी सुरज उगलमुगले हा पोलीस कर्मचारी आहे.
यापूर्वी त्याच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत.
मात्र पोलीस निरीक्षक निलेश माईणकर (Police Inspector Nilesh Mainkar) यांनी कारवाई केली नाही.
त्यामुळे त्यांनाही सह आरोपी करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.

 

Web Title :- Nashik Crime | policeman knife attack on wife and mother in law stabbed father in law dead in nashik

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा