Nashik Crime | दुर्दैवी ! पाटावर पोहण्यासाठी गेलेल्या 3 शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – Nashik Crime | नाशिक जिल्ह्यातील एक दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले (Nashik Crime) आहे. येथील मखमलाबादमध्ये 3 अल्पवयीन शाळकरी मुलांचा पाटाच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू (Died) झाला आहे. ही घटना मखमलाबाद पेठ लिंक रोडवरील तुळजाभवानी नगरमध्ये घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. निलेश मुळे (Nilesh Mule), प्रमोद जाधव (Pramod Jadhav), सिद्धू धोत्रे (Sidhu Dhotre) असं या मृत मुलांचे नावे आहेत. हे तिन्ही मुले अंदाजे 14 ते 15 वर्ष वयोगटातील आहेत.

याबाबत माहिती अशी, हे तिन्ही मित्र आज (मंगळवारी) दुपारी 1 वाजेच्या सुमारास आपल्या शाळेतील इतर मित्रांसह पाटावर पोहण्यासाठी गेले होते. पाण्यात उतरल्यानंतर सर्वजण खेळत होते. मात्र पाण्यात पुढे गेल्यावर त्यांना पाण्याचा प्रवाह आणि खोलीचा अंदाज आला नाही. त्यामुळे या 5 जणांमधील तिघे जण पाण्यात बुडू लागले. आपले मित्र पाण्यात बुडूत असल्याचे पाहून दोघांनी आरडा ओरडा केला. तेथील स्थानिकांना मदतीसाठी आरडाओरडा केला. (Nashik Crime)

 

दरम्यान, परिस्थितीमुळे घाबरलेल्या या 2 मुलांनी तेथील ठिकाणाहून पळ काढला. यानंतर तेथील स्थानिक नागरीक दाखल झाले. पाण्यात तिघे बुडाल्याचे आढळल्याने याबाबत माहिती अग्निशमन दलाला आणि पोलिसांना दिली. पोलीस (Police) आणि अग्निशमन दलाचे जवान (Fire Brigade) तातडीने घटनास्थळी दाखल होऊन अर्धा तासात तिघांना पाण्याबाहेर काढले. यानंतर तिन्ही मुलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले गेले. परंतु दुर्दैवाने उपचारापुर्वी तिघाही मुलांचा मृत्यु (Died) झाला असल्याचं रुग्णालय प्रशासनाने सांगितलं. त्यावेळी संबधित मुलांच्या कुटुंबांनी एकच आक्रोश केला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

Web Title :- Nashik Crime | unfortunate death of 3 school children who went for a swim in the water at nashik

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Income Tax Alert | जर कॅशमध्ये केली ‘ही’ 5 कामे तर येईल टॅक्स संदर्भात नोटिस ! जाणून घ्या इन्कम टॅक्सचे नियम

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये सक्रिय रुग्णांच्या संख्येत वाढ ! गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 59 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Navale Bridge Accident | दुर्दैवी ! नवले पुलाजवळील अपघातात 15 दिवसांपूर्वी लग्न झालेल्या तरुणाचा मृत्यू

Omicron Covid Variant | केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय ! दिल्लीत पुन्हा निर्बंध लागू; शाळा-कॉलेज, थिएटर्स पुन्हा बंद

Anti Corruption Bureau Pune | पुण्यात वॉरंट रद्द करण्यासाठी 2 हजाराची लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात