Nashik Crime | दोघा भावांवर सपासप वार करत जीवघेणा हल्ला; नाशिक शहरातील खळबळजनक घटना, Video व्हायरल

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – Nashik Crime | नाशिक (Nashik) शहरातील वडाळा नाका (Wadala Naka) ठिकाणी धक्कादायक घटना घडली आहे. त्या परिसरात दोघा भावांवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला (Attack) केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. आरोपींनी चिकनच्या दुकानातील कोयत्यानं दोघा भावांवर भररस्त्यात सपासप वार केले आहेत. दिवसाढवळ्या झालेल्या या थरार हल्याप्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा थरार CCTV मध्ये कैद झाला असून सर्वत्र प्रसारित (Nashik Crime) होत आहे.

याबाबत माहिती अशी, अमीर खान (Aamir Khan) आणि मझर खान (Mazar Khan) असे हल्ला झालेल्या दोघां भावांची नावे असून दोघांनाही स्थानिक खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. याठिकाणी दोघांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ CCTV मध्ये कैद होऊन मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतरही पोलिसांनी कारवाई करण्यात विलंब लावला आहे. म्हणून परिसरातील दुकानदारांकडून संतापाची भावना व्यक्त केली जाते.

काय आहे प्रकरण?

नाशिक येथील वडाळा नाका परिसरात पीडित भावांचं आणि आरोपीचं चिकनचं दुकान (Chicken shop) आहे. तर, जखमी भाऊ अमीर खान आणि मझर खान यांनी संबंधित चिकन दुकानदाराची तक्रार पोलिसांत (Police) केली होती. पोलिसांत तक्रार दिल्याने आरोपींनी दुकानासमोर येऊन याबाबत जाब विचारायला सुरुवात केली. त्यावेळी त्यांच्यात वाद निर्माण झाला. यावरून वाद वाढला. आरोपीने रागाच्या भरात दोघा भावांवर चिकनच्या दुकानातील कोयत्यानं सपासप वार केला. या हल्ल्यामध्ये दोन्ही भावंड रक्ताच्या थारोळ्यात कोसळले.

या दरम्यान, आरोपींनी हल्ला केल्यानंतर तेथून पसार झाले. यानंतर तेथील स्थनिकांनी जखमी
भावांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी हलवले. भररस्त्यात झालेल्या या हल्ल्यामुळे रस्त्यावर
अनेक नागरिकांनी घटना बघण्यासाठी गर्दी केली होती. या घटनेनंतर रस्त्यावर अनेक ठिकाणी रक्त
सांडलं होतं.

हे देखील वाचा

Pune Crime | 58 गुंठे जमीन बळकवण्यासाठी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याच्या धमकीच्या गुन्ह्यातील संशयित नितीन हमनेचा जामीन मंजूर

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Nashik Crime | video of deadly attack on two brothers in nashik blood bath on road

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update