Nashik Crime | नाशिकमधील धक्कादायक घटना ! ​प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच पतीचा काढला काटा

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – Nashik Crime | नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील गणेश नगर येथील एका तरूणाच्या खुनाचा छडा (Nashik Crime) पोलिसांनी लावला आहे. सचिन उर्फ काळू दुसाने (Sachin Dusane) असं हत्या (Murder in Nashik) झालेल्या तरूणाचे नाव आहे. या हत्येमागं पत्नीचा हात असल्याचं समोर आलं आहे. आपल्या प्रियकराच्या मदतीने त्याची हत्या केल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

 

याबाबत माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी सचिन दुसाने यांचा मृतदेह पेठ पोलीस ठाण्याच्या (Peth Police Station) हद्दीत आढळून आला होता. ही हत्या कोणी केली? का केली? याचा कोणताही पुरावा पोलिसांकडे नव्हता. यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला असता महत्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. सचिन दुसाने यांची पत्नी आणि बांधकाम व्यावसायिक दतात्रय महाजन (Dattatraya Mahajan) यांचे प्रेमसंबंध (love Affair) असल्याची माहिती पोलिसांना समजली. या माहितीनूसार पोलिसांनी तपास सुरू केला. (Nashik Crime)

यानंतर पोलिसांनी दतात्रय महाजनला ताब्यात घेत चौकशी सुरु केली. यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सचिनची पत्नी आणि दतात्रयने सचिनच्या घरातच त्याची हत्या केली.
यासाठी त्यांनी संदीप रखामी (Sandeep Rakhmi), गोरख जगताप (Gorakh Jagtap), अशोक काळे (Ashok Kale)
आणि पिंटू मोगरे (Pintu Mogre) यांची मदत घेतली. हत्येनंतर त्यांनी हत्यारांची आणि मोबाईलची विल्हेवाट लावली,
तसेच, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वापरलेली डस्टर कार भंगार व्यावसायिकांना स्क्रॅप मध्ये विकली आहे.

 

दरम्यान, सचिन हा त्याच्या पत्नीच्या आणि दत्तात्रय महाजन यांच्या प्रेम संबंधात अडसर ठरत होता.
त्यामुळे या दोघांनी सचिनचा गेम करण्याचं ठरवलं. यासाठी त्यांनी एका रिक्षाचालक आणि इडली डोसा विकणाऱ्याला 1 लाख रुपयांची सुपारी दिली होती.
दरम्यान, यानंतर पोलिसांकडून (Police) सहा मोबाईल फोन आणि 1 लाखांची रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

Web Title :- Nashik Crime | wife commits murder of husband with the help of boyfriend in niphad of nashik district

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Digital Currency vs Cryptocurrency | क्रिप्टो करन्सी आणि डिजिटल करन्सीमध्ये फरक काय?, जाणून घ्या

 

Digital Currency | कसा करणार ‘डिजिटल रुपया’ने व्यवहार, मोबाईलच असेल आता बँक!

 

Maharashtra Police Uniform | पोलिस उप अधिक्षक ते उपनिरीक्षक या दर्जाच्या अधिकाऱ्यांची ट्युनिक गणवेशापासून सुटका, DGP संजय पांडे यांनी काढले आदेश