Nashik Dindori Road Accident | बोलेरो-दुचाकीच्या भीषण अपघातात ५ ठार, नाशिक-दिंडोरी मार्गावरील दुर्घटना

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन नाशिक – दिंडोरी मार्गावर (Nashik Dindori Road Accident) ढकांबे गावाजवळ बोलेरो जीप आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात ५ जण ठार झाले. तर काही जण जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताचे वृत्त समजताच दिंडोरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

आज दुपारी ढकांबे गावाजवळ नाशिक-दिंडोरी मार्गावर बोलेरो कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. अपघातात दुचाकी आणि बोलेरो गाडीचा चक्काचूर झाला. टायर फुटल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातानंतर पोलीस आणि स्थानिकांनी मदतकार्य सुरु केले. (Nashik Dindori Road Accident)

अपघातात जखमी झालेल्यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर मृत व्यक्तींचे मृतदेह नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rohit Pawar On Praful Patel | प्रफुल्ल पटेलांची 840 कोटींची केस सीबीआयने बंद केली, आता काहीही बोलू शकतो असं त्यांना वाटतंय : रोहित पवार

Pune Police News | पुणे: पोलिस कर्मचाऱ्याची गोळी झाडून आत्महत्या

Shivsena UBT Vs Eknath Shinde | ठाकरेंच्या नेत्याने शिंदे गटाच्या जखमेवर चोळले मीठ, १३ पैकी ७ खासदारांची तिकीटे कापली, आता मातोश्रीची आठवण…