शाळेचं साहित्य मागितल्याने दारुड्या बापाने मुलीला चक्‍क विष पाजलं

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या भारतात मुली-महिला या प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. तसंच मुलगी शिकली, प्रगती झाली, असंही आपण म्हणतो. मुलगी शिक्षणासाठी हट्ट करते तेव्हा कोणतेही वडिल ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र नाशिकमध्ये मुलीने शिक्षणासाठी लागणाऱ्या साहित्याचा हट्ट केला म्हणून शेतकरी वडिलांनी तिचा जीवच घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. या शेतकरी वडिलांचे नाव पंढरीनाथ बोराडे असं आहे.

मुलीने शाळेसाठी लागणाऱ्या साहित्याची मागणी केली. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्याने तिला कीटकनाशक पाजल्याची माहिती समोर आली आहे. सहाव्या इयत्तेत शिकणाऱ्या मुलीने शालेय साहित्य विकत घेण्यासाठी काही पैशांची मागणी केली. मात्र दारुच्या नशेत असणाऱ्या पित्याला या गोष्टीचा राग आला. त्याने चक्क कीटकानाशक पाजून मुलीचा जीवच घेण्याचा प्रयत्न केला. नाशिकमधील शिंदे गावात शुक्रवारी रात्री हा प्रकार घडला.

दारुड्या पित्याचा मुलीच्या शिक्षणाला विरोध होता. पंढरीनाथ बोराडे शुक्रवारी दारू पिऊन घरी आल्यानंतर मुलीने अभ्यासाची पुस्तके विकत घेण्यासाठी पैसे मागितले. मात्र याता राग आल्याने पंढरीनाथ यांनी मुलीला मारहाण करत तिला कीटकनाशक पाजले. त्यानंतर तिला घरातील इतरांनी त्वरीत रुग्णालयात नेण्यात आले. तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, हे कृत्य करणाऱ्या पंढरिनाथ यांच्या धाकट्या मुलाने वडिलांविरोधात पोलीसात तक्रार केली. त्यानंतर हे प्रकरण समोर आले. त्यानंतर पोलीसांनी त्याला अटक केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त