कलयुग ! सासर्‍याचा सुनेवर चक्क ‘इनोव्हा’ कारमध्ये बलात्कार, सासूनं तर ‘नस’च कापली

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – कुलयुगात कधी काय घडेल याचा नेम नाही. एवढचं नव्हे तर आपल्याला कधी काय वाचनात येईल अथवा काय पाहण्यास मिळेल हे सांगता येत नाही. अशीच एक घटना नाशिक जिल्हयातील गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. सासर्‍यानं सुनेवर चक्क इनोव्हा कारमध्ये बलात्कार केल्याचं आणि त्यानंतर प्रकरण दडपण्यासाठी सासूनं सुनेच्या हाताच्या नसाच कापल्याचं प्रकरण समोर आलं आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांपैकी एकाला अटक देखील करण्यात आली आहे.

अशोक (51), आकाश (पती) आणि सासू प्रमिला यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगापूर पोलिसांनी याप्रकरणी बलात्कारासह कोटुंबिक हिंसाचार कायदा, मारहाण आणि धमकाविण्याचा गुन्हा दाखल केला आहे. बलात्कार करणारा सासरा अशोक याला अटक करण्यात आली आहे. पिडीत सुनेच्या फिर्यादीनुसार, हा सर्वप्रकार दि. 1 फेब्रुवारी ते दि. 18 मार्च 2019 दरम्यान घडला आहे. नराधम सासरा अशोकनं राहत्या घरात तसेच चांडक सर्कलजवळ असलेल्या निर्जनस्थळी एका इनोव्हा कारमध्ये सुनेवर बलात्कार केला. एवढेच नाही तर सासर्‍याने याबाबत कोणाला सांगितलं तर मुलासोबत नांदु देणार नाही अशी धमकी देखील दिली. पिडीत सुनेनं मोठं धाडस करत घडलेला सर्व प्रकार पती आणि सासुला सांगितला. मात्र, त्या दोघांनी देखील प्रकरणावर पडदा टाकला. आकश जाधव आणि सासु प्रमिला जाधव यांच्याकडून शारीरिक आणि मानसिक त्रासाला सुरवात झाली.

सासू प्रमिला यांनी आपल्या हाताची नस देखील कापल्याचा आरोप सुनेनं केला आहे. पती, सासु आणि सासर्‍याकडून वेळावेळी होणार्‍या त्रासाला कंटाळून अखेर सुनेनं पोलिसांकडे धाव घेतली आणि तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अचंल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक एन.व्ही. पवार करीत आहेत. या घटनेमुळं सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Visit : Policenama.com