Nashik Graduate Constituency | विखे समर्थकांच्या व्हाट्सअ‍ॅप स्टेटसवर सत्यजीत तांबे; स्थानिक भाजपचा असणार सत्यजीत तांबे यांना पाठिंबा?

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – Nashik Graduate Constituency | पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा झाल्यापासूनच नाशिक पदवीधर मतदारसंघ चर्चेत आहे. काल या मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या. मात्र तरीदेखील भाजपकडून (BJP) कोणत्याही उमेदवाराला अधिकृत पाठिंबा जाहीर करण्यात आला नाही. त्यातच भाजपचे अहमदनगर दक्षिणचे खासदार सुजय विखे हे तयारीला लागल्याचे समजते. सुजय विखे-पाटील (Sujay Vikhe-Patil) समर्थकांनी एक व्हाट्सअ‍ॅप स्टेटस ठेवले आहे. त्यातून सुजय विखे-पाटील आणि एकंदरीतच स्थानिक भाजप नेत्यांचा कल कोणत्या उमेदवाराकडे आहे. हे यावरून स्पष्ट होते. (Nashik Graduate Constituency)

 

सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघातून (Nashik Graduate Constituency) अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर भाजपकडून या मतदारसंघातून कोणालाही उमेदवारी देण्यात आलेली नाही. त्यामुळे भाजपचा पाठिंबा सत्यजीत तांबे यांना असणार का? असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र काल प्रचार संपला तरीदेखील भाजपकडून कोणाला पाठिंबा देणार हे अधिकृतपणे सांगण्यात आलेले नाही. मात्र खासदार सुजय विखे-पाटील हे कामाला लागले असल्याचे समजते.

 

सुजय विखे-पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी एक व्हाट्सअॅप स्टेटस ठेवले आहे. त्यात सत्यजीत तांबे यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विखे-पाटील यांच्या जनसेवा ऑफिसच्या व्हाट्सअॅप ग्रुपवर देखील सत्यजीत तांबे यांचा फोटो शेअर करत विजयी भवः असं लिहिण्यात आले आहे. तसेच विखे यांच्या शेकडो कार्यकर्त्यांकडून सत्यजीत तांबे यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे भाजपकडून स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे सांगण्यात आले आहे.

नुकतचं खासदार सुजय विखे-पाटील यांनी रात्रीत चमत्कार घडणार. असे वक्तव्य केले होते. त्यामुळे आता अहमदनगर भाजप सत्यजीत तांबे यांच्या पाठीमागे असल्याचे बोलले जात आहे. तसे सुतोवाच काल माध्यमांशी संवाद साधताना खासदार सुजय विखे-पाटील यांनी केले होते.

 

त्यावेळी बोलताना सुजय विखे-पाटील म्हणाले, ‘पाठिंब्याबाबत पक्षाची भूमिका अद्याप स्पष्ट नाही मात्र आम्ही आघाडीच्या उमेदवाराला मतदान करणार नाही.
हे स्पष्ट आहे. आम्ही भूमिपुत्र म्हणजेच जिल्ह्यातील उमेदवाराच्या पाठीशी उभं राहणार आहे.
दुसऱ्या जिल्ह्यातील उमेदवाराला पाठिंबा का द्यावा? अशी जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांची भावना असल्याने त्यांच्या भावना
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना सांगणार आहोत.
पक्षाने स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे आदेश दिलेत त्यामुळे जिल्ह्याला जर चांगली संधी मिळत असेल तर त्याचं सोनं केलं जाईल.’
असे म्हणत त्यांनी जवळपास सत्यजीत तांबे यांना स्थानिक भाजपचा पाठिंबा राहणार असे निश्चित केले होते.
त्यामुळे नाशिक पदवीधर मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागले आहे.
यासाठीची मतदानप्रक्रिया दि.३० जानेवारी रोजी पार पडणार आहे.

 

Web Title :- Nashik Graduate Constituency | bjp mp sujay vikhe patils supporters support satyajit tambe

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sai Tamhankar | मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर आहे एवढ्या कोटींची मालकीण जाणून घेऊया तिच्याबद्दल

Rani Chatterjee | भोजपुरी अभिनेत्री राणी चॅटर्जीने ‘तो’ निर्णय घेतला मागे; लवकरच झळकणार ‘या’ मालिकेत

Latur Crime News | सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल