Nashik Graduate Constituency | आमदार कपिल पाटील यांचा सत्यजीत तांबे यांना पाठिंबा

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – नाशिक पदवीधर मतदारसंघातील (Nashik Graduate Constituency) नाट्यमय घडामोडींनंतर अखेर अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) आणि महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांच्यात सामना होणार आहे. दरम्यान सत्यजीत तांबे यांच्यावर काँग्रेस पक्षाकडून रोज टीका होत असताना त्यांच्यासाठी एक सुखद बातमी समोर आली आहे. शिक्षक भरतीचे आमदार कपिल पाटील यांनी सत्यजीत तांबे यांना पाठींबा जाहीर केला आहे. त्यानंतर तांबे पिता-पुत्रांनी कपिल पाटील यांचे आभार मानले. (Nashik Graduate Constituency)

कपिल पाटील (Kapil Patil) यांचा पाठिंबा मिळाल्यानंतर त्यांचे आभार व्यक्त करताना सत्यजीत तांबे म्हणाले की, ‘माझी सुरुवातच आंदोलनामधून, युवक चळवळीमधून झालेली आहे. प्रसंगी स्वत:च्या सरकारविरोधात, मंत्र्यांविरोधातदेखील मी आंदोलनं केलेली आहे. कारण, मुद्दा महत्त्वाचा आहे प्रश्न महत्त्वाचा आहे. तो सोडवायाचा कसा याचं ज्ञान मागील २२ वर्षांमधील अनुभवातून मला आलेलं आहे. प्रश्न कसे सोडवायचे यामध्ये कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितच येणाऱ्या काळात मी काम करेन. याची मी सगळ्यांना ग्वाही देतो.’ असे म्हणत त्यांनी कपिल पाटील यांचे आभार मानले. (Nashik Graduate Constituency)

सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देण्याअगोदर कपिल पाटील म्हणाले होते की,
‘नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत काय भूमिका घ्यायची,
या बद्दल शिक्षक भारती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नाशिकमध्ये होते आहे. त्यासाठी मी चाललो आहे.
कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा कल बघून आम्ही संयुक्तपणे याबद्दलचा निर्णय़ घेऊ.
एकमात्र गोष्ट खरी आहे की नागपूर शिक्षक मतदार संघामध्ये आघाडीला वारंवार सांगूनही,
आम्हाला पाठिंबा दिलेला नाही. त्या बद्दलच एक रोष कार्यकर्त्यांमध्ये आहे.
दुसऱ्या बाजूला आघाडी कुठेही लढतानाही दिसत नाही. या दोन्ही बाबींचा विचार करून आम्ही निर्णय घेऊ.
तसेच, सत्यजित तांबे हे जुने मित्र आहेत. ते भेटणार आहेत मला आणि त्यांच्याशी आम्ही चर्चा करू त्यांची
भूमिका समजून घेऊ आणि त्यानंतर त्याबद्दल निर्णय़ घेऊ.’ असे म्हणाले होते.
त्यानंतर त्यांनी आज आपला पाठिंबा सत्यजीत तांबे यांना जाहीर केला.

Web Title :-Nashik Graduate Constituency | nashik graduate constituency election shiksha bharati sangathanas mla kapil patil support to satyajit tambe

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | ‘प्रत्येक महिन्याला 5 हजार दिले नाहीतर…’, पान टपरी चालकाकडे खंडणी मागणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक

Supriya Sule | सुप्रिया सुळेंचा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना टोला; म्हणाल्या – ‘विरोधातील दिवस देखील…’