Nashik Graduate Constituency | अखेर काँग्रेस पक्षाकडून सत्यजीत तांबे यांचे निलंबन

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन | नाशिक पदवीधर मतदार (Nashik Graduate Constituency) संघात नाट्यमय घडामोडी घडण्याचे सत्र काही थांबताना दिसत नाही. नाशिक पदवीधर मतदार संघातून अपक्ष अर्ज दाखल केल्यानंतर आज अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सत्यजीत तांबे यांचे काँग्रेस पक्षाकडून निलंबन करण्यात आले आहे. काल (दि.१५) रोजी नाशिक पदवीधर मतदार संघाचे विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांचे निलंबन केल्यानंतर आज त्यांचे पुत्र आणि याच मतदार संघातील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले सत्यजीत तांबे यांच्यावर कारवाई करत काँग्रेस पक्षाने त्यांचे निलंबन केले आहे. (Nashik Graduate Constituency)

सत्यजीत तांबे यांच्याकडे आमदार-खासदार यांसारखे कुठलेही पद नसल्याने त्यांच्याविरूध्दची कारवाई ही केंद्रीय शिस्तभंग समितीकडून नव्हे तर प्रदेश काँग्रेसच्या स्तरावरून होऊ शकते. अशी माहिती काँग्रेसचे केंद्रीय समितीचे सदस्य तथा प्रदेश महासचिव विनायक देशमुख यांनी दिली. त्यामुळे विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्याप्रमाणेच सत्यजीत तांबे यांच्या विरोधात देखील निलंबनाची कारवाई होणार आहे. (Nashik Graduate Constituency)

काँग्रेस पक्षाने एबी फॉर्म देऊन देखील आपला उमेदवारी अर्ज न दाखल केल्यामुळे डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आले असून त्यांची पुढील चौकशी होणार आहे. त्यावर बोलताना डॉ. सुधीर तांबे म्हणाले होते की, यात आपली काहीही चूक नसून ते चौकशी अंती समोर येईल. मात्र काल दि.१५ रोजी डॉ. सुधीर तांबे यांच्यावर काँग्रेस पक्षाकडून कारवाई करण्यात आली होती. त्याचवेळी सत्यजीत तांबे यांच्यावर देखील का कारवाई झाली नाही ? असा प्रश्न राजकीय वर्तुळातून विचारला जात आहे. (Nashik Graduate Constituency)

डॉ. सुधीर तांबे यांच्यावर काँग्रेस पक्षाच्या शिस्तभंग विषयक समितीने कारवाई केली आहे.
प्रदेश काँग्रेसकडून पाठविण्यात आलेल्या प्राथमिक अहवालाच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली आहे.
डॉ. सुधीर तांबे यांचे प्रकरण हे केंद्रीय समितीकडे पाठवावे लागले होते.
मात्र सत्यजीत तांबे हे आमदार किंवा खासदार नसल्याने त्यांच्यासंबंधीचा निर्णया हा समितीकडून नव्हे
तर प्रदेशाकडून होणे अपेक्षित आहे. डॉ. सुधीर तांबे यांच्यावर कारवाई झाल्यानंतर आता सत्यजीत तांबे
यांच्या विरूध्द देखील कारवाई करण्याच्या सुचना प्रदेश समितीकडे आल्या आहेत.
त्यानुसार लवकरच सत्यजीत तांबे यांना कारवाईचा आदेश दिला जाणार आहे.
(Nashik Graduate Constituency)

Web Title :- Nashik Graduate Constituency | satyajeet tambe suspended congress high command orders

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Punit Balan Celebrity League (PBCL) | दुसरी ‘पुनित बालन सेलिब्रीटी लीग’ क्रिकेट स्पर्धा; पन्हाळा जॅग्वॉर्स संघाने विजेतेपद पटकावले

Gold Rate Today | सोन्याच्या दराचे रेकॉर्ड ब्रेक! सोन्याच्या दराचा आणखी एक नवा रेकॉर्ड, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे सोन्याचे दर