Nashik Graduates Constituency Election | सुधीर तांबेनी पक्षाला फसवलं, सत्यजीतला पाठिंबा नाही; नाना पटोलेंनी स्पष्ट केली भूमिका

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – Nashik Graduates Constituency Election | महाराष्ट्रात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. यादरम्यान, नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत (Nashik Graduates Constituency Election) मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. नाशिक पदवीधर विधान परिषदेसाठी काँग्रेसने (Congress) पुन्हा डॉ. सुधीर तांबे (Dr. Sudhir Tambe) यांना उमेदवारी जाहीर केली होती. पक्षाकडून एबी फॉर्म देखील देण्यात आला. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल करताना सुधीर तांबे यांनी ऐनवेळी माघार घेतली आणि त्यांच्याऐवजी मुलगा सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी अर्ज दाखल केला. यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

सुधीर तांबे यांनी पक्षाला फसवलं आहे. त्यामुळे नाशिक पदवीधर मतदारसंघात (Nashik Graduates Constituency Election) काँग्रेस सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देणार नसल्याची स्पष्ट भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली आहे. गुरुवारी झालेल्या घडामोडींचा अहवाल हायकमांडला दिला आहे. याबाबतचा पुढील निर्णय हायकमांड घेतील. मात्र काँग्रेस बंडखोर उमेदवाराला पाठिंबा देणार नसल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. ते आज सकाळी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

भाजपवर गंभीर आरोप

काँग्रेसने पक्षाच्या वतीनं सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती. परंतु त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही.
सुधीर तांबे यांनी काँग्रेस पक्षाला फसवलं असल्याचे नाना पटोले म्हणाले.
सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळं काँग्रेस त्यांना पाठिंबा देणार नाही.
यावेळी त्यांनी भाजपवरही (BJP) निशाणा साधला.
भाजप भय दाखवून घरं फोडण्याचं काम करत असल्याची टीका पटोले यांनी केली.
भाजप आज दुसऱ्याची घरं फोडून आनंद घेत आहे.
पण ज्यादिवशी भाजपचे घर फुटेल त्यादिवशी त्यांना घरं फोडण्याचे दु:ख काय असते ते समजेल असे पटोले म्हणाले.

Web Title :- Nashik Graduates Constituency Election | nashik graduate constituency congress will not support satyajeet tambe saya nana patole

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ashish Shelar | दावोस दौऱ्यासंदर्भात संजय राऊतांची प्रतिक्रिया म्हणजे ‘खाई त्याला खवखव’, आशिष शेलारांचे प्रत्युत्तर (व्हिडिओ)

Karisma Kapoor And Abhishek Bachchan | अभिषेकसोबत लग्नासाठी जया बच्चन यांनी करिष्मासमोर ठेवली होती अट