Nashik News : सत्ताधारी भाजपला हाय कोर्टाचा दणका; स्थायी समितीत सेनेची सदस्य संख्या वाढणार
नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – नाशिक महापालिकेत सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसला आहे. तौलनिक संख्याबळानुसार स्थायी समिती सदस्य नियुक्ती करण्याच्या निर्णयाविरोधात शिवसेनेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर न्यायालयाकडून हिरवा कंदील मिळाला असून सेनेच्या बाजूने निकाल लागला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार तौलनिक संख्याबळानुसार शिवसेनेला एक जागा वाढवून मिळणार आहे. त्यामुळे शिवसेनेची सदस्य संख्या आता एक ने वाढणार आहे.
नाशिक महानगरपालिकेत भाजपचे सर्वाधिक नगरसेवक असले तरी नाशिक रोडच्या पोटनिवडणुकीत मात्र भाजपचा पराभव झाला होता. त्याशिवाय फुलेनगरच्या नगरसेविका शांताबाई हिरे यांच्या निधनामुळे भाजपचे संख्याबळही घटल होते. तौलनिक संख्याबळाचा विचार करता स्थायी समितीत शिवसेनेचा एक सदस्य वाढला असल्याचा दावा केला जात असताना महापौर सतीश कुलकर्णी यांनी गेल्या वर्षी स्थायी समितीवर भाजपचे आठऐवजी नऊ सदस्यांची नियुक्ती केल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. त्यानंतर शिवसेना गटनेते विलास शिंदे आणि विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार सेनेच्या बाजूने निकाल लागला आहे.