एकतर्फी प्रेमातून घरात घुसून 18 वर्षीय तरूणीवर 18 सपासप वार, प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न

लासलगाव (नाशिक) : पोलीसनामा ऑनलाइन – एकतर्फी प्रेमातून 18 वर्षीय तरूणीवर धारदार शस्त्राने सपासप वार करून गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना लासलगाव येथील कोटमगाव रस्त्यावरील दत्तनगरमध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून आरोपीने तरूणीवर 18 वार केले आहेत. यानंतर त्याने स्वत:वर वार करून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार आज दुपारी घडला आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे लासलगाव शहर हादरून गेले आहे.

एकतर्फी प्रेमातून आतिश ढगे या युवकाने आज दुपारी बाराच्या सुमारास मुलीच्या घरात प्रवेश करत तिच्यावर धारदार शस्त्राने हात, पाय, पोट, छातीवर सपासप वार केले. मुलीच्या ओरडण्याचा आवाज आल्याने कॉलनीतील लोकांनी तिच्या घराकडे धाव घेतली. घरामध्ये रक्ताचा सडा पाहून घाबरलेल्या नागरिकांनी याची माहिती लासलगाव पोलिसांना दिली.

घटनेची माहिती मिळताच लासलगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी हल्ल्यामध्ये वापरण्यात आलेले शस्त्र ताब्यात घेतले आहे. तर जखमी मुलीवर लासलगाव येथील रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी नाशिक येथे पाठवण्यात आले आहे. तर आरोपी आतिश ढगे याच्यावर निफाड येथील रुग्णालयात हालवण्यात आले.

Loading...
You might also like