नाशिकच्या वीरपुत्राला शोकाकूल वातारणात अखेरचा निरोप

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – जम्मू-काश्मीरमधील बडगाममध्ये हेलिकॉप्टर अपघातात वीरगती प्राप्त झालेल्या स्क्वार्डन लीडर निनाद मांडवगणे यांच्यावर नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या काठावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. वीर जवान अमर रहे तसेच भारत माता की जय अशा घोषणांनी निनाद यांना अखेरचा निरोप देण्यात आला. निनाद यांच अंत्यदर्शन घेण्यासाठी मोठा जनसमुदाय लोटला होता.

जम्मू-काश्मीरच्या भारत-पाक सीमेवर सुरु असणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत गेल्या चार दिवसांपासून लढाऊ हेलिकाॅप्टरद्वारे सीमेवर टेहाळणी करत असताना हेलिकाॅप्टर कोसळून वैमानिक निनाद अनिल मांडवगणे (वय ३३ ) यांना वीरमरण आले. आज सकाळी लिडर निनाद मांडवगणे यांचं पार्थिव नाशिकला त्यांच्या राहत्या घरी दाखल झालं. निनादच्या घराबाहेर निनाद यांचे नातेवाईक आणि नाशिककर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. अंत्यदर्शनासाठी हे पार्थिव ठेवण्यात आलं होतं. यावेळी, निनाद यांच्या पार्थिवाला त्यांच्या अवघ्या दोन वर्षांच्या मुलीने डोकं टेकून नमस्कार केला आणि तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले. निनाद यांच्या वडिलांनी त्यांना मुखाग्नी दिला.

निनाद यांचं शिक्षण भोसला मिलिटरी स्कूल आणि औरंगाबादच्या सैनिक संस्थेत झालं होतं. त्यानंतर त्यांनी बी. ई. मेकॅनिकल इंजिनीयरिंग पूर्ण करून हैद्राबाद ट्रेनिंग कमिशनमध्ये ट्रेनिंग पूर्ण केलं आणि २००९ साली तो भारतीय वायुदलात स्कॉड्रन लिडर पदावर सेवेत रुजू झाले. गुवाहाटी, गोरखपूर इथं सेवा केल्यानंतर केवळ महिन्यापूर्वीच त्यांची श्रीनगर येथे बदली झाली होती.

हेलिकाॅप्टर दुर्घटना : नाशिकमधील शहीद सुपुत्रावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार