महाभयंकर ! भर चौकात तरूणाला टोळक्याकडून ‘बेदम’ मारहाण, Video पाहिल्यास अंगावर येतील ‘काटे’ (व्हिडिओ)

मनमाड : पोलीसनामा ऑनलाइन – पूर्व वैमनस्यातून एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. अंगावर शहारे आणणारा हा व्हिडिओ उत्तर प्रदेश किंवा बिहारमधील नसून महाराष्ट्रातील आहे. राज्यातील नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहरातील असल्याचे सांगण्यात येत आहे. 3 ते 4 जणांनी अत्यंत निर्दयीपणे लाठ्या-काठ्यांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली. दोन गटात मागील काही वर्षापासून वाद होता. याच वादातून तरुणाला मारहाण केली आहे.

मारहाणीमध्ये तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक समरसिंह साळवे यांनी दिली. काठ्यांनी एका टोळक्याने तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना मनमाडच्या डॉ. आंबेडकर चौकात घडली आहे. याप्रकरणात पोलिसांनी 7 जणांना अटक केली आहे तर त्यांचे इतर चार साथीदार फरार झाले आहेत. पोलीस फरार झालेल्यांचा शोध घेत आहेत.

मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी 11 जणांवर गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरु केला. पोलिसांनी 7 जणांच्या मुसक्या आवळल्या असून चार जण फरार झाले आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये टोळके एका तरुणाला अमानुषपणे मारहाण करत आहे. भरचौकात घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत असून पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.