नाशिकच्या महापौरांनी दिले ‘हे’ महत्वाचे आदेश, जादा बिल आकारणारे रूग्णालये ‘रडार’वर

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – रुग्णांना अवाजवी बिले आकारून तसेच रुग्णांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या नफेखोरी रुग्णालयांना टाळे ठोकले जाईल, असा इशारा महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिला आहे. तसेच कार्पोरेट हॉस्पिटल Hospital सेवा देण्यासाठी आले की रुग्णांची लूट करण्यासाठी आले, असा प्रश्न देखील कुलकर्णी यांनी उपस्थित केला. तसेच रुग्णांच्या मदतीसाठी ‘रामायण’ या महापौर बंगल्यामध्ये हेल्पलाइन केंद्र सुरू केले जाणार आहे. नागरिकांनी येथे तक्रारी कराव्यात, असे आवाहन कुलकर्णी यांनी केले आहे.

‘वीज कर्मचाऱ्यांना फ्रन्टलाईन वर्कर दर्जा देऊन 50 लाखांचे विमा संरक्षण द्या’; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी

वोक्हार्ट रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी मोठे आंदोलन झाले. कोरोना रुग्णांवर उपचार केला जात असताना काही कार्पोरेट कंपन्या आर्थिक लूट करीत आहेत. रुग्णालय प्रशासनाने दर्जेदार सेवा देताना नफेखोरी करू नये. अवाजवी बिल आकारून रुग्णांची पिळवणूक करत असल्यास त्या रुग्णालयांना सरळ टाळे ठोका, अशा सूचना महापौरांनी यावेळी प्रशासनाला दिल्या. शहरातील वोक्हार्ट या खासगी रुग्णालयामध्ये रुग्णांच्या होत असलेल्या पिळवणुकीबाबत महापौर कुलकर्णी यांच्या रामायण या बंगल्यावर भाजप नेत्यांची मनपा अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीला आमदार प्रा. देवयानी फरांदे, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, सभागृहनेते सतीश सोनवणे, महापालिकेचे मुख्य लेखापरीक्षक बोधीकिरण सोनकांबळे, तसेच कार्पोरेट रुग्णालयांमध्ये नियुक्त केलेले लेखापरीक्षक उपस्थित होते.

मासिक पाळीदरम्यान कोरोना व्हॅक्सीन घेणे किती सुरक्षित ? जाणून घ्या एक्सपर्टकडून

तक्रारीसाठी हेल्पलाइन ‘रामायण’वर
नागरिकांना योग्य ठिकाणी मदत मिळावी, यासाठी लेखापरीक्षक नियुक्त केले आहेत. रुग्ण व नातेवाइकांचा त्रास पाहता, महापौर कुलकर्णी यांना आपल्या रामायण या शासकीय निवासस्थानी तक्रारीसाठी हेल्पलाइन केंद्र सुरू करण्याची घोषणा केली आहे. हॉस्पिटल Hospital बिलाबाबत नागरिकांना काही शंका किंवा तक्रारी असल्यास, त्यांनी हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. त्यासाठी येत्या दोन-तीन दिवसांत ‘रामायण’ येथे नव्याने यंत्रणा उभारून हेल्पलाइन सुरू केली जाणार आहे. दरम्यान, भाजप नेत्यांनी बैठक घेतल्यानंतर आयुक्त कैलास जाधव यांचीही याबाबत भेट घेतली. यावेळी महापौरांसह भाजप पदाधिकाऱ्यांनी मुख्य लेखापरीक्षकांवर लक्ष ठेवण्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठीत करावी, सर्व बिलांचे लेखापरीक्षण विभागामार्फत करावे, रुग्णालयातील मेडिकल स्टोअरवर नियंत्रण आणण्यासाठी व्यवस्था उभी करावी, फार्मसीसकडून त्यांची तपासणी व्हावी, बिलांच्या तपासणीसाठी अन्न व औषध विभागीचीही मदत घ्यावी, अशा सूचना आयुक्तांसमोर मांडल्या. आयुक्तांनीही या सूचनांची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

बँक बुडाली तर बुडणार 4.8 कोटी खात्यांवरील रक्कम, जाणून घ्या तुमचे डिपॉझिट सुरक्षित आहे किंवा नाही

कार्पोरेट हॉस्पिटल्सकडून Hospital रुग्णांची आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. नियमात बिले न घेणाऱ्या व जास्त तक्रार असलेल्या रुग्णालयांना थेट टाळे ठोका, अशा सूचना प्रशासनाला केल्या आहेत.
सतीश कुलकर्णी, महापौर

Also Read This : 

‘या’ ९ पदार्थांनीसुद्धा दूर करा कॅल्शियमची कमतरता, जाणून घ्या

 

पेट्रोल, डिझेलच्या दरात महिन्यातील 15 व्या वेळेस वाढ !

TATA ग्रुपने बिग बास्केटमध्ये खरेदी केली मोठी भागीदारी, Amazon आणि Flipkart ला मिळणार ‘टक्कर’

Aadhaar कार्ड Lock करण्याची सोपी पद्धत, असे करा लॉक; तुमची माहिती राहिल सुरक्षित, जाणून घ्या

 

जुन्या नावाने नवीन औषधे विकण्यास केंद्राची बंदी