Nasik : संतापजनक ! अश्लील व्हिडीओ दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन –   एका नातेवाईक तरुणाने अल्पवयीन मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवून तिच्यावर (minor-girl-rape) बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. या प्रकरणी तरुणावर उपनगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुभम साहेबराव शेवाळे (वय २४) असे गुन्हा दाखल केलेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुभम हा जेलरोड-कॅनलरोड परिसरात राहत होता. ऑगस्ट महिन्यात त्याचे परिसरात भांडण झाले होते. त्याचा स्वभाव सुधारावा म्हणून घरच्यांनी त्याला जयभवानी रोडवरील नातेवाईकांच्या घरी राहण्यास पाठविले होते. नातेवाईकाकडे राहत असताना त्याने सहा ते २८ ऑगस्ट दरम्यान नातेवाईकाच्या घरातील अल्पवयीन मुलीला मोबाइलमध्ये अश्लील व्हिडीओ दाखवून तिच्यावर अतिप्रसंग तसेच अनैसर्गिक कृत्य केले. मुलीच्या आईला मोबाइल व्हाट्सअप चॅटिंगवरून ही बाब लक्षात आली. तिच्या तक्रारीवरुन शुभम शेवाळेविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.