Nashik MLC Election | भाजप सत्यजीत तांबेंना पाठिंबा देणार?, देवेंद्र फडणवीसांनी ठेवला सस्पेन्स, म्हणाले-‘वाट पहा…’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – नाशिक पदवीधर मतदारसंघातून (Nashik MLC Election) काँग्रेसकडून (Congress) सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र अर्ज दाखल करण्याच्या काही वेळापूर्वी सुधीर तांबे यांनी माघार घेतली. तर सत्यजीत तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसने सुधीर तांबे यांना एबी फॉर्म दिला होता परंतु त्यांनी माघार घेतली. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला (Nashik MLC Election) आहे. तर दुसरीकडे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी भाजपचा (BJP) पाठिंबा घेण्याची तयारी दर्शवली आहे. यावर पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सत्यजीत तांबे यांच्या कामाचे कौतुक करताना योग्य वेळी निर्णय घेऊ असे म्हणत पदवीधर निवडणुकीत सस्पेन्स ठेवला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, नाशिक निवडणुकीबाबत (Nashik MLC Election) योग्य वेळी योग्य भूमिका घेऊ. सत्यजीत तांबे युवा नेतृत्व आहे. त्यांचे काम चांगले आहे. सर्व राजकीय निर्णय धोरणांप्रमाणे योग्यवेळी करावे लागतात. त्यानुसार यावर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सांगितल्याप्रमाणे निर्णय घेऊ असे फडणवीस यांनी सांगितले.

तसेच सत्यजीत तांबे यांच्या पुस्तक प्रकाशनाला मी जरुर गेलो. त्याठिकाणी बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) हे देखील होते. इतर पक्षातील नेतेही होते. राजकीय पक्षात एकमेकांच्या कार्यक्रमात जाणे नवीन नाही. योग्य वेळी सर्व गोष्टी तुमच्यासमोर येतील. वाट पहा. आम्ही तिथे कोण उमेदवार द्यावा यासाठी प्रयत्न करत होतो. विखेंनी तिथे उमेदवारी घ्यावी अशी आमची इच्छा होती. परंतु काही कारणास्तव त्यांनी असमर्थता दाखवली, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

बंडखोर उमेदवाराला पाठिंबा नाही-नाना पटोले

सुधीर तांबे यांनी पक्षाला फसवलं आहे. त्यामुळे नाशिक पदवीधर मतदारसंघात
(Nashik Graduates Constituency Election) काँग्रेस सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देणार नसल्याची
स्पष्ट भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी घेतली आहे.
गुरुवारी झालेल्या घडामोडींचा अहवाल हायकमांडला दिला आहे. याबाबतचा पुढील निर्णय हायकमांड घेतील.
मात्र काँग्रेस बंडखोर उमेदवाराला पाठिंबा देणार नसल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.

Web Title :- Nashik MLC Election | devendra fadnavis statement on satyajit tambe regarding nashik graduate election

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Unauthorized School | ‘त्या’ शाळांवर गुन्हा दाखल करा, जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश

Pune Crime News | 50 लाखांच्या खंडणीसाठी मुंबईतील 3 बिल्डरचे पुण्यातून अपहरण, गुन्हे शाखेकडून काही तासात सुटका; तिघांना ठोकल्या बेड्या

Gauri Khan | गौरी खान तिच्या लूकमुळे होते वायरल; चाहते करत आहेत कौतुक