नाशिक-मुंबई महामार्गावर अपघात, नगरसेवकासह तिघे ठार

शहापूर : पाेलीसनामा ऑनलाईन

नाशिक-मुंबई महामार्गावर स्विफ्ट कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला आहे. अपघातात धुळे महापालिकेतील नगरसेवक कुमार देयलानी यांच्यासह दोघेजण जागीच ठार झाले आहेत. कारमध्ये एकून पाच जण होते.
[amazon_link asins=’B00UWM5JJI,B01MSYQWNY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’21367808-b812-11e8-9ff6-53086e22b0bd’]

याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी सकाळी कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ती पेंढरघोळजवळ पलटी झाली. अपघातात धुळ्याचे नगरसेवक कुमार देयलानी यांच्यासह सोबत असलेले राजीव भाटिया, लखू महाराज यांचा जागीच मृत्यू झाला. तर रमेश कुकरेजा व हुसेन अत्राम हे जखमी झाले आहेत. जखमींना शहापूरच्या सय्यद हाॅस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले अाहे. शहापूर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे करीत आहेत.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा.

पोलीसनामाला ट्विटरवर फाॅलो कर.

पोलीसनामाचे युट्यूब चॅनेलला सब्सक्राईब करा.

पोलीसनामाच्या टेलिग्राम चॅनेलला जाॅईन व्हा.