आयुक्त तुकाराम मुंढेंच्या ‘या’ प्रश्नांवर तरुण इंजिनिअर निरुत्तर

नाशिक | पोलीसनामा आॅनलाईन – आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पालिकेतील एका तरुण इंजिनिअरला विचारलेल्या प्रश्नांना उत्तर न देता आल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या तरुणाला साध्या प्रश्नाचे उत्तर न देता आल्यामुळे तुकाराम मुंढेंनी त्याला चांगलेच झापले.
याबाबत सविस्तर माहिती, वाॅक विथ कमिशनर या कार्यक्रमाच्या वेळी रस्त्यावर मुरुम कधी टाकतात, हे माहित आहे का ?  सिव्हिल इंजिनिअरचे बेसिक प्रिन्सिपल सांग ? असे प्रश्न मुंढे यांनी एका तरुण सिव्हिल इंजिनिअरला विचारले होते. या प्रश्नांना तरुण इंजिनिअर निरुत्तर झाला. वाॅक विथ कमिशनर कार्यक्रमात मग आयुक्तांनी सर्वांनाच अभियांत्रिकेचे धडे दिले.
नविन इंजिनिअरला रस्त्यावर मुरुम कधी टाकतात, हेच माहित नाही. तसेच सिव्हिल इंजिनिअरचे बेसिक प्रिन्सिपल सुद्धा माहित नसल्याचे उघड झाले. वाॅक विथ कमिशनर कार्यक्रमात आयुक्त मुंढे यांनी तरुण इंजिनिअरला चांगलेच झापले. यावेळी युवा सिव्हिल इंजिनिअर निशब्द झाला. दरम्यान, रस्ता खराब असताना फक्त मुरुमच टाकला नंतर काहीच केले नाही, असा प्रश्न या तरुण इंजिनिअरने विचारला होता. त्यानंतर हा सर्व प्रकार पुढे आला.
तुकाराम मुंढे यांची झाडाझडती
-रस्त्यावर मुरुम कधी टाकतात माहिती आहे का ?
-सिव्हिल इंजिनिअरचे बेसिक प्रिन्सिपल सांग ?
– यावेळी युवा सिव्हिल इंजिनिअर निशब्द
– प्रश्नांचा भडीमार करत आयुक्तांनी दिले वॉक विथ कमिशनर कार्यक्रमात इंजिनिअरिंगचे धडे
– रस्ता खराब असतांना फक्त मुरूमच टाकला नंतर काहीच केले नाही असा प्रश्न युवा सिव्हिल इंजिनिअरने विचारला होता.