तुकाराम मुंढेंचा मास्टरस्ट्रोक, सात बड्या अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन 

तुकाराम मुंढे ‘बस नामही  काफी है ‘…! आतापर्यंत अवघ्या महाराष्ट्राला हे नाव परिचित आहे. त्यांच्या धडाकेबाज कामगिरीसाठी  प्रसिद्ध आहेतच काम न करणाऱ्या  आणि नियमबाह्य वागणाऱ्यांना यापूर्वी देखील मुंढेंनी दणका दिला आहे. आता नाशिक महापालिकेच्या सात बड्या अधिकाऱ्यांना दणका दिल्याची माहिती आहे. कामातील अनियमततेप्रकरणी अतिरिक्त आयुक्तांसह सात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश नाशिक महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिलेत.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e5829655-cde7-11e8-9be9-69d87ac0b15e’]

गंगापूर रोडवरील बहुचर्चित ग्रीन फिल्ड प्रकरणासह इतर प्रकरणात तुकाराम मुंढेंनी अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश दिलेत. सातही अधिकऱ्यांवर वेगवेगळ्या प्रकरणात अनियमिततेप्रकरणी दोषारोप निश्चित करत विभागीय चौकशी करण्याचा प्रस्ताव मुंढेंनी तयार केला असून, तो प्रस्ताव महासभेच्या मान्यतेसाठी पाठवलाय.

नवरात्रात शिवसेनेकडून गुरुग्राममधील मांसविक्रीची 400 दुकानं बंद

कुणा-कुणाच्या चौकशीचे आदेश?
  • अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे
  • अतिक्रमण निर्मुलन विभागाचे उपायुक्त आर. एम. बहिरम
  • नगररचना विभागाचे कार्यकारी अभियंता पी. बी. चव्हाण
  • माजी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र भंडारी
  • माजी शहर अभियंता यू. बी. पवार
  • माजी अग्निशमन अधिकारी अनिल महाजन
  • लेखाधिकारी घोळप

    सत्तेत कोणीही चिरकाल नाही, गिरीश बापट

    दरम्यान, किशोर बोर्डे हे परसेवेतील अधिकारी असल्याने, त्यांच्या चौकशीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला जाणार आहे. शासनाने परवानगी दिल्यानंतरच बोर्डेंची चौकशी केली जाईल.

    [amazon_link asins=’B0756Z53JN,B01DDP7D6W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’be17fdd5-cde8-11e8-921d-61db4698ca38′]

काम चुकारांना सुट्टी नाही … !

दरम्यान,  पुण्यात तुकाराम मुंढे यांनी पुणे महानगरपरिवहन महामंडळ लिमिटेडच्या अध्यक्षपदी काम केले होते या दरम्यान देखील  तुकारात मुंढे यांनी सतत गैरहजर राहणाऱया बसचालकांवर मोठी कारवाई केली होती. एकूण 158 बसचालकांना मुंढेंनी बडतर्फ केले  होते.

[amazon_link asins=’8192910962,0062641549′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’19dfe39e-cde8-11e8-a234-552dae799121′]

तुकाराम मुंढे हे शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखले जातात. पुण्यात  पीएमपीएमएलचेअध्यक्ष झाल्यापासून त्यांनी वाहतूक व्यवस्थेत सुधारणेच्या दृष्टीने मोठी पावले उचलली होती.  तुकाराम मुंढे हे 2005 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. 4 मे 2016 रोजी नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामाविरोधात धडक कारवाई करण्याचा सपाटा त्यांनी लावला होता. त्यामुळे त्यांच्याविरोधात पालिकेत एकमताने अविश्वास ठराव मंजूर झाला. त्यानंतर त्यांची पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आली होती.

[amazon_link asins=’0143442295,817992162X’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’37815675-cde8-11e8-b71b-7fab6b15d0c4′]