नाशिक महानगरपालिकेच्या इमारतीला आग (व्हिडीओ)

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट मधिल आगीची घटना ताजी असताना आज नाशिक महानगरपालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील कार्यालयाला आग लागली आहे. ही आग महानगरपालीकेतील शिवसेना गटनेत्याच्या कार्यालयाला लागली आहे.

दरम्यान तातडीने अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम शर्तीने चालू आहे. ही आग सकाळी ११.३० च्या सुमारास लागल्याची माहिती मिळत आहे, आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्यापही मिळाली नाही.