नाशिकमधून 402 मेट्रिक टन द्राक्ष निर्यात, फायटोसॅनिटरी प्रमाणपत्रास 15 जानेवारीपर्यंत मुदत

लासलगांव : पोलीसनामा ऑनलाइन (राकेश बोरा) – आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीमुळे संपुर्ण जगामध्ये भुरळ पाडणाऱ्या द्राक्ष निर्यातीला यंदाच्या अवकाळीचा मोठा फटका बसल्याचे दिसून येत आहे. या अवकाळी पावसाने यंदाच्या हंगामात द्राक्ष उत्पादनाचे गणित विस्कटवले आहे. यंदा जवळपास दीड महीना द्राक्ष निर्यात उशीराने सुरू झाल्याने द्राक्ष निर्यातीला फटका बसल्याचे दिसून येत आहे. या हंगामात १२ जानेवारी पर्यंत 30 कंटेनरद्वारे 402 मेट्रिक टन द्राक्षाची निर्यात झाली आहे. नेदरलँड, जर्मनी आणि युनायटेड किंगडममध्ये ही द्राक्ष निर्यात करण्यात आलेली आहे. मागील वर्षी  12 जानेवारी 2019 पर्यंत 85 कंटेनर द्वारे 1216 मेट्रिक टन द्राक्षाची निर्यात झालेली होती. मागील वर्षीच्या तुलनेमध्ये जवळपास 200 टक्क्याने द्राक्ष निर्यातीमध्ये घट झाल्याचे एपीडाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.

दुसरीकडे सध्या द्राक्ष निर्यात नोंदणी करण्यासाठी आवश्यक असलेले फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी 15 जानेवारी पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागा असून अवकाळी पावसामुळे यंदा हे प्रमाण 50 टक्क्यांपर्यंत कमी होण्याचा अंदाज आहे. खराब वातावरणामुळे बागा वाचविण्यासाठी औषधांची मोठ्या प्रमाणात फवारणी करावी लागत आहे. द्राक्षांच्या दर्जावर प्रतिकूल हवामानाचा परिणाम होणार असल्याने निर्यात घटण्याचा धोका आहे. द्राक्ष निर्यातीसाठी कृषी विभागाकडे प्लॉट नोंदणी करणे आवश्यक असल्याने दिनांक 12 जानेवारी पर्यंत 32 हजार 736 शेतकऱ्यांनी बागांची नोंदणी केली आहे.

दिवाळीत झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागांचे नुकसान झाले .हंगामपूर्व द्राक्ष फेकून देण्याची वेळ आली. तर वेगवेगळ्या टप्प्यात असणाऱ्या बागांनाही झळ सहन करावी लागली. केवडा, भुरीचा प्रादुर्भाव झाल्याने काहींना बागा सोडून द्याव्या लागल्या. या सर्वाचा परिणाम द्राक्ष हंगामावर होणार आहे. या एकंदर स्थितीत निर्यातीसाठी नोंदणी करणाऱ्या उत्पादकांची संख्या घसरली आहे.

12 जानेवारी 2020पर्यंत द्राक्ष निर्यात

नेदरलॅंड – 20 कंटेनर -275 मेट्रिक टन
जर्मनी – 7 कंटेनर – 89 मेट्रिक टन
युनाइटेड किंगडम – 3 कंटेनर – 38 मेट्रिक टन

प्रमुख जिल्ह्यांतील द्राक्ष बाग नोंदणी (आकडेवारी एपीडानुसार)
नाशिक – 28014
सांगली – 2018
पुणे – 1125
उस्मानाबाद – 220
सातारा – 427
सोलापुर – 246

देशाची द्राक्ष निर्यात
2015-16  –  132647 मेट्रिक टन – 1361.26 कोटी
2016-17  –  198471  मेट्रिक टन –  1781.71 कोटी
2017-18  –  188221  मेट्रिक टन – 1900 कोटी
2018-19  –  246133 मेट्रिक टन-  2335 कोटी

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like