Nashik News | आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली ! नाशिकमध्ये डेंग्यू, चिकनगुणियाचा प्रादुर्भाव अधिक; डेंग्यूची रुग्णसंख्या 700

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन –  Nashik News | कोरोनाच्या (Corona Virus) जीवघेण्या दुस-या लाटेचा प्रभाव सध्या आटोक्यात आला असतानाच कोरोनाच्या तिस-या लाटेचा धोका देखील तज्ञांकडून व्यक्त केला आहे. अशातच आता नाशिक (Nashik News) जिल्ह्यात डेंग्यू (Dengue)आणि चिकनगुणियाच्या (Chikungunya) आजाराने डोकं वर काढलं आहे. जिल्ह्यात चिकनगुनिया आणि डेंग्यु आजाराने फैलाव केला आहे. या आजाराचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

नाशिक जिल्ह्यात मागील दहा दिवसामध्ये 140 जणांना डेंग्यूची (Dengue) लागण झाली आहे. तसेच तब्बल 45 जणांना चिकनगुणियाची (Chikungunya) बाधा झाली आहे. या आजारामुळे जिल्ह्यातील खासगी रुग्णालयात गर्दी झाली आहे. यामुळे आता जिल्हा प्रशासनाची आणि आरोग्य विभागाची (District Administration and Health Department) चिंता वाढली आहे. नाशिकच्या महिला भाजप आमदारालाही डेंग्यूची बाधा झाली आहे. चिंतेची बाब म्हणजे लहान मुलांच्या आजाराचंही प्रमाणही दुपटीनं वाढलं आहे. जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या 700 च्या वर तर चिकनगुणियाचे 95 रुग्ण आढळून आले आहेत.

दरम्यान, 1 जानेवारी ते 14 सप्टेंबर या कालावधीत 717 डेंग्यूचे तर 537 चिकूनगुनियाचे रुग्ण आढळले. ऑगस्ट महिन्यात 1362 संशयित रुग्णांचे नमुने तपासण्यात आले होते. त्यात 311 जणांना डेंग्यू झाल्याचं आढळून आले होते. तर चिकनगुणियाचे 730 नमुने तपासण्यात आले. त्यापैकी 210 जणांना या आजाराची बाधा झाली आहे. ही आकडेवारी 5 वर्षांतील विक्रम तोडणारी आकडेवारी आहे.

 

डेंग्यूचा ताप कमी करण्यासाठी उपयुक्त औषधी वनस्पती कोणती?

1. पपईची पानं –

पपईची पानं डेंग्यू तापाच्या नैसर्गिक उपचारांसाठी वापरली जाऊ शकतात. त्याची पानं चिरडून रस काढा आणि नंतर कापडाच्या सहाय्याने गाळून घ्या. हा शुद्ध रस प्या. पोषक आणि सेंद्रिय संयुगं यांचं मिश्रण प्लेटलेट्सची संख्या वाढवतं. यातील जीवनसत्त्व सी रोगप्रतिकारक शक्ती सुधारतं आणि रक्तातील विषारी द्रव बाहेर टाकण्यास मदत करतं. असं myupchar चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला यांनी सांगितलं आहे.

2. कडूनिंबाची पानं –

डेंग्यूच्या तापामध्ये कडूनिंबाच्या पानांचा अर्क पिणं फायदेशीर ठरतं.
यामुळे रक्त प्लेटलेट्स तसंच पांढर्‍या रक्त पेशींमध्ये वाढ होते.
कडूनिंबाच्या पानांचा रस रोगप्रतिकारक शक्ती सुधारू शकतो. त्यामुळे हे उपयुक्त आहे.

3. मेथीची पानं –

मेथीची पानं ताप तसंच वेदना कमी करण्यात फायदेशीर ठरू शकतात.
डेंग्यू तापाची लक्षणं कमी करण्यासाठी मेथीची पानं हा लोकप्रिय उपाय आहे.
एवढंच नाही यामुळे चांगली झोप येण्यास देखील मदत होते.

 

4. तुळशीची पानं –

आयुर्वेदिक औषधात डेंग्यू तापाच्या उपचारांसाठी बराच काळ तुळशीची पानं घेण्याची शिफारस केली जाते. तुळशीची पानं आणि काळी मिरी पाण्यात उकळवा आणि प्या.
यामुळे रोग प्रतिकारशक्ती देखील वाढू शकते.

5. बार्ली/जव गवत –

बार्लीपासून बनवलेला चहा प्या किंवा बार्ली गवत थेट खा.
त्याच्या सेवनानं प्लेटलेट्सची संख्या वेगानं वाढण्यास मदत होते.

 

Web Title : Nashik News | dengue chikungunya patients increase crossed seven hundred

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | संतापजनक ! 12 वर्षाच्या मुलाचा 4 वर्षाच्या मुलीवर अनैसर्गिक अत्याचार

Gold Price Today | सोनं खरेदीची सुवर्णसंधी ! 9358 रूपयांनी झालं Gold स्वस्त, जाणून घ्या

Modi Government | खुशखबर ! 15 दिवसानंतर आठवड्यात केवळ 4 दिवस काम आणि 3 दिवस सुटी, ‘टेक होम सॅलरी’ होणार कमी; ‘हे’ नियम होणार लागू