Nashik News | नाशिकमध्ये जादूटोणा विरोधी कायद्याविरोधात साधू-महंत एकवटले; साधू-महंतांकडून कायदा रद्द करण्याची मागणी…

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – Nashik News | महाराष्ट्रात लागू असलेल्या जादूटोणा विरोधी कायदा (Anti-Witchcraft Act) रद्द करण्यासाठी नाशिक येथील साधू-महंत एकवटले असून हा कायदा बंद करण्याची मागणी त्यांच्याकडून केली जात आहे. या संबंधीच्या बैठकीचे आयोजन नाशिक येथील रामकुंडावर करण्यात आले होते. यावेळी सर्व आखाड्यातील महंत तसेच हिंदुत्ववादी संघटनांनी आपली उपस्थिती नोंदविली. तसेच या बैठकीत राज्य सरकारकडे हा कायदा बंद करण्याची मागणी करण्यात आली. (Nashik News)

मागील काही दिवसांपासून धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Krushna Shasri) आणि अंदश्रद्धा निर्मुलन समिती (Anti-Superstition Committee) यांच्यात जोरदार संघर्ष पहायला मिळत आहे. यावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती साधू-संतांविरोधात आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. यावर आता नाशिकमधील साधू-महंतांनी एकत्र येत हा कायदा बंद करण्याची मागणी केली आहे.

काही दिवसांपूर्वी धीरेंद्र शास्त्री हे नागपूर येथे आले होते. त्यांच्याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. त्यावरून चांगलाच वाद निर्माण झाला होता. अंनिसचे राम माधव (Ram Madhav) यांनी आचार्य धीरेंद्र शास्त्री यांना खुले आव्हान दिले होते. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केलेले दावे सिध्द करून दाखवावे असे थेट आव्हान दिले होते. चमत्कार दाखवा आणि ३० लाख रूपये मिळवा. असे थेट आव्हान देण्यात आले होते. (Nashik News)

त्यानंतर मात्र धीरेंद्र शास्त्री यांनी नागपूर येथून काढता पाय घेतला.
नियोजीत वेळेच्या अगोदर म्हणजेच तीन दिवस आधी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी रायपूरला पळ काढला.
त्यानंतर अंनिस कडून त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.
हे प्रकरण सध्या चांगलेच गाजत असून त्याच पार्श्वभूमीवर नाशिक येथील साधू-महंत यांनी एकत्र येत बैठक आयोजीत केली होती.
नाशिकचे महंत अनिकेत शास्त्री जोशी (Aniket Shasri-Joshi) यांनी आवाहन करत नाशिकमधील साधू
म्हणून त्यांना एकत्र केले आहे. त्यानुसार नाशिकच्या रामकुंड परिसरात बैठक होणार असून या बैठकीत अंधश्रद्धा निर्मूलन कायदा रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या बैठकीत सर्व आखाड्याचे साधु संत, संन्यासी, पुरोहित संघ तसेच सर्व हिंदुत्ववादी संघटना हजर राहणार असून जादू टोणा कायद्याला विरोध दर्शवणार आहेत.

यावर बोलताना अनिकेत शास्त्री जोशी म्हणाले की, ‘महाराष्ट्रातून जादूटोना विरोधी कायदा रद्द करण्यात यावा.
या कायद्याचा मुळ उद्देश भरकटला आहे. यात फक्त आणि फक्त हिंदू धर्मगुरूंना टार्गेट केले जात आहे.
त्यामुळे हा कायदा लवकरात लवकर रद्द करण्यात यावा. अनेकदा मौलाना, पादरी, भंते यांच्याकडून चमत्कार
सिध्द करावयाचे दावे केले जातात. ते जर त्यांनी सिध्द केले तर आम्ही ५१ लाख रूपयांचे बक्षिस देऊ.
असे आव्हान देखील यावेळी बोलताना अनिकेत शास्त्री जोशी यांनी यावेळी बोलताना दिले.

Web Title :- Nashik News | sadhu mahant aggressive in nashik about shyam manv and bageshwer dham dispute

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Shirsat | ‘बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्याचा त्यांना अधिकार नाही,’ या आदित्य ठाकरेंच्या वक्तव्याचा संजय शिरसाट यांनी घेतला चांगलाच समाचार; म्हणाले…

Health Tips | 2023 मध्ये पूर्णपणे बदलून जाईल आरोग्य, डाएट प्लानमध्ये या 4 फूडचा करा समावेश

Jalgaon ACB Trap | 25 हजार रुपये लाच स्वीकारताना ग्रामसेवक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात