Nashik News | धक्कादायक! नाशिकमध्ये होतोय चालता बोलता नागरिकांचा मृत्यू, एकाच दिवशी 5 जणांचा मृत्यू: शहरात खळबळ

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना (Corona) आणि ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे (Omicron Covid Variant) नागरिक भयभीत झाले असताना नाशिकमधील (Nashik News) नागरिक वेगळ्याच कारणामुळे भयभीत झाले आहेत. नाशिकमध्ये (Nashik News) चालता बोलता लोक बेशुद्ध होऊन त्यांचा मृत्यू (Unconscious Death) होत आहे. या घटनांमध्ये वाढ होत असून शुक्रवारी (दि.5) शहरातील वेगवेगळ्या भागात बेशुद्ध होऊन 5 जणांचा मृत्यू झाला आहे. बेशुद्ध होऊन श्वास घेण्याचा त्रासाने मृत्यू होण्याचे प्रमाण पुन्हा वाढले आहे.

पहिली घटना नाशिक शहरातील (Nashik News) खुटवडनगर (Khutwadnagar) येथे उघडकीस आली आहे. भगवान श्यामराव पाईकराव (वय-62 रा. सैई वैभव, वृंदावन नगर, खुटवडनगर) हे शुक्रवारी सकाळी 10.30 च्या सुमारास घरात अचानक बेशुद्ध झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात (District Hospital) दाखल करण्यात आले. त्यावेळी डॉ. शिंदे यांनी भगवान पाईकवार यांना मृत घोषित केले.

दुसरी घटना सातपूर (Satpur) येथे घडली आहे. नदीर सिकंदर जमादार (वय-45 रा. विजयनगर, म्हैसाळ सांगली) हे सातपूर येथील डायनॅमिक प्रिस्टेज कंपनी (Dynamic Prestige Company) शुक्रवारी दुपारी 12 च्या सुमारास त्यांच्या गाडीत बेशुद्ध आढळून आले. त्यांना त्याच अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले असता डॉ. शिंदे (Dr. Shinde) यांनी त्यांना मृत घोषीत केली. सातपूर पोलीस ठाण्यात (Satpur Police Station) आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तीसरी घटना भद्रकाली भागात घडली आहे. सचिन दादाराव उसरे (वय-32 रा. सय्यद लॉज, भद्रकाली) हे शुक्रवारी 9.15 च्या सुमारास लॉजच्या बाथरुममध्ये बेशुद्ध पडले. त्यांना उपचारासाठी त्यांचा मित्र विजय पाटील यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषीत केले. भद्रकाली पोलीस ठाण्यात (Bhadrakali Police Station) आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

 

चौथ्या घटनेत गंगापूर शिवारातील (Gangapur Shivar) धर्माजी कॉलनीत राहणारे हिरामण आप्पाजी गवारे (वय-73 रा. केवलगार्डन, गंगापूर शिवार) यांना राहत्या घरी श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. हिरामण यांना त्रास होऊ लागल्याने ते बेशुद्ध पडले. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉ. भुसारे (Dr. Bhusare) यांनी मृत घोषित केले.

पाचवी घटना पेठ रोडवरील अश्वमेध नगर येथे घडली. वाल्मीक निंबा चव्हाण (वय-8) यांना रात्री
नऊच्या सुमारास श्वास घेण्याचा त्रास होऊ लागला. वाल्मीक यांचा मुलाने त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात
उपचारासाठी दाखल केले. डॉ. धूम (Dr. Dhoom) यांनी तपासून मृत घोषित केले.
म्हसरुळ पोलीस ठाण्यात (Mhasrul police station) आकस्मिक मृत्यू नोंद करण्यात आली आहे.

Web Title :- Nashik News | Shocking! Citizens are dying suddenly in Nashik, 5 people die in 24 hours: Sensation in the city

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Former MLA Mohan Joshi | ‘पुण्यातही 500 चौरस फुटांपर्यंतच्या मिळकत धारकांना करमाफी द्यावी’ – प्रदेश काँग्रेस

Delhi High Court | ‘लग्नापूर्वी आजार लपवणे फसवणूक आहे, रद्द होऊ शकतो विवाह’ – दिल्ली हायकोर्ट

Pune Crime | 51 वर्षीय पत्नीच्या चारित्र्यावर 59 वर्षाच्या पतीचा संशय, गळा घोटून संपवलं; पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील घटना