खुशखबर ! आता कार्डशिवाय काढा एटीएममधून पैसे

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन- सर्वच नागरिकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. आता एटीएम कार्डच्या वापराशिवाय ग्राहकांना एटीएममधून पैसे काढता येणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने ही सेवा सुरु केली आहे.  योनो कॅश असं या सेवेचं नाव आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये 25 योनो कॅश पाॅईट विकसित करण्यात आले आहेत.

इतकेच नाही तर, एसबीआयच्या तब्बल 16 हजार 500 एटीएममध्ये योनो कॅश सेवेने पैसे काढणे शक्य होणार आहे. बँकेचे नाशिक विभागाचे उपमहाप्रबंधक सुधीर भागवत यांनी याबाबत माहिती दिली आहे. मुख्य म्हणजे अशा प्रकारची सेवा देणारी एसबीआय ही देशातील पहिली बँक ठरली आहे असेही भागवत यांनी सांगितले.

बँकेचे नाशिक निभागाचे उपमहाप्रबंधक सुधीर भागवत यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली आहे. याबाबत बोलताना सुधीर भागवत म्हणाले की, “देशात आर्थिक आणि जीवनशैलीविषयक सेवांचा लाभ ज्याप्रकारे घेतला जातो त्यात सुधारणा करण्यासाठी योनो हे एसबीआयचे एक मोठे पाऊल आहे. 85 ई कॉमर्स कंपन्यांकडून कस्टमाईज्ड उत्पादने व सेवा देणारी ही पहिली सर्वंकष डिजीटल बँकींग सुविधा आहे. योनो एसबीआयमध्ये नोव्हेंबर 2017 ला दाखल झाले आहे. आता ही सुविधा वर्षभराची झाली आहे.

पुढे बोलताना भागवत म्हणाले की, ” फेब्रुवारी 2019 पर्यंत योनोने 18 लाखापेक्षाही अधिक डाऊनलोडची नोंद केली आहे. मुख्य म्हणजे या सेवेचे 7 लाखांपेक्षाही अधिक सक्रीय युजर्स आहेत. अँड्रॉईड व आयओएस असणाऱ्या मोबाईल फोनव्दारे आणि ब्राऊजरव्दारे वेबवर योनोचा वापर करता येऊ शकतो” असेही भागवत म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us