गर्भलिंग निदान चाचणी कऱणाऱ्या ‘त्या’ डॉक्टरला २ वर्षे शिक्षा

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – गर्भलिंग कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या एका डॉक्टरला न्यायालयाने २ वर्षांची शिक्षा आणि २० हजार रुपयांचा दंडाची शिक्षा नाशिक न्यायालयाने ठोठावली आहे.डॉ. राजेंद्र पाडे असे डॉक्टरचे नाव आहे.

डॉ. राजेंद्र पांडे याने गर्भलिंग निदान कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर नाशिक न्यायालयात याप्रकरणी २०१४ पासून सुनावणी सुरु होती. डॉ. पांडे या प्रकरणात दोषी आढळल्यानंतर त्याला २ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.