नाशिक ऑक्सिजन टाकी गळती; नेमकी कशी घडली घटना, जाणून घ्या

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन –   आज दुपारी नाशिकमधील महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झाल्याने २२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. येथील हॉस्पिटलमध्ये अनेक रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. तर असा प्रकार कसा घडला आहे याबाबत चौकशीचे आदेश दिले गेले आहेत. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळेच आमचे रुग्ण दगावल्याच्या प्रतिक्रिया रुग्णांचे नातेवाईक देत होते. तर, हॉस्पिटलमधील मोठ्या ऑक्सिजन टाकीचा कॉक नादुरुस्त असल्याची समजते. त्यामधूनच तशी गळती झाली आहे. अशी माहिती समोर आलीय.

अधिक माहितीनुसार, टाकीचा कॉक नादुरुस्त असला तरी दुरुस्तीद्वारे ही गळती थांबवता येते आणि येथेही तोच प्रयत्न झाला. परंतु, दुरुस्तीचे हे काम सुरू असताना टाकीचा हा नादुरुस्त असलेला कॉक पूर्णपणे तुटला आणि ऑक्सिजन गळती सुरू झाली. येथे नवा कॉक बसवण्यासाठी सुमारे २ तासांचा कालावधी लागला. तो पर्यंत टाकीतील सर्व ऑक्सिजनची गळती झालेली होती. यानंतर याचा परिणाम थेट व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांवर झाला. ऑक्सिजनची टाकीच पूर्ण रिकामी झाल्यामुळे रुग्णालयातील व्हेंटिलेटरद्वारे देण्यात येत असलेल्या ऑक्सिजनचा दाब कमी झाला आणि त्या रुग्णांना ऑक्सिजन मिळाले नाही. त्यामुळे असा प्रकार घडला आहे.