Nashik Ozar Airport | नाशिक विमानतळाच्या नामांतरासाठी 9 ऑगस्ट रोजी महामोर्चा; पुण्यात झाली सर्व दलीत, पक्ष संघटनांच्या नेत्यांची बैठक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – नाशिक ओझर येथील विमानतळास (Nashik Ozar Airport) कर्मवीर दादासाहेब गायकवाड (karmaveer dadasaheb gaikwad) यांचे नाव देण्याची मागणी होत आहे. येत्या 9 ऑगस्ट रोजी आंबेडकरी जनतेच्या वतीने या मागणीसाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या पूर्वतयारीसाठी पुण्यातील अल्पबचत भवन येथे राज्यव्यापी बैठकीचे आयोजन रिपब्लिकन युवा मोर्चा चे प्रदेशाध्यक्ष राहुल डंबाळे (Rahul Dambale, State President of Republican Youth Front) यांनी केले होते. नाशिक विमानतळास (Nashik Ozar Airport) कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे यांचे नाव देण्यासाठी बऱ्याच वर्षापासून मागणी आहे.

परंतु या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्यामुळे आंबेडकरी जनतेमध्ये रोष आहे त्यासाठी पुन्हा एकदा मागणी जोर धरत आहे. त्यासाठीच येत्या 9 ऑगस्ट रोजी नाशिक येथील महामोर्चात महाराष्ट्रातील सर्व पक्ष संघटना तील नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. यावेळी कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी नागरिकांनी खबरदारी घेऊन सहभागी व्हावे असे आव्हान राहुल डंबाळे यांनी यावेळी केले.

यावेळी राजकीय पक्ष भेद बाजूला सारून सर्वांनी या आंदोलनात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन रिपब्लीकन पक्षाचे राष्ट्रीय नेते तानसेन भाई ननावरे यांनी केले.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार जयदेव गायकवाड (former mla jaidev gaikwad) होते.
यावेळी आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते दयाल बहादूरे, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, दलीत कोब्रा चे भाई विवेक चव्हाण, वंचित आघाडीचे शहराध्यक्ष मुनवर कुरेशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार पुण्यातील बैठकीत करण्यात आला.
या बैठकीस माजी आमदार, राष्ट्रवादीचे नेते एडवोकेट जय देव गायकवाड,
रिपब्लिकन पक्षाचे नेते तानसेन ननावरे, माजी उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे,
नगरसेविका लता राजगुरू दलित पँथरचे अध्यक्ष यशवंत नडगम,
रिपब्लिकन जनशक्ती चे प्रदेशाध्यक्ष शैलेंद्र मोरे, भिम छावाचे अध्यक्ष श्याम गायकवाड,
रिपब्लिकन युवक आघाडीचे अध्यक्ष शैलेश चव्हाण, यासह पुणे शहरातील काँग्रेस,
राष्ट्रवादी सह आंबेडकरी चळवळीतील नेते व प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने या बैठकीस उपस्थित होते.

Web Titel :- Nashik Ozar Airport | Mahamorcha on August 9 for renaming of Nashik Airport; A meeting of leaders of all Dalits and party organizations was held in Pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Linking Vaccine certificate to Passport | व्हॅक्सीन सर्टिफिकेट पासपोर्टशी ‘या’ पध्दतीनं लिंक करा; जाणून घ्या प्रक्रिया अन् महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे

Pune Crime | परमीटरुममध्ये जाऊन हप्ता मागणार्‍या तोतया महिला पत्रकारासह दोघांना अटक

NPS New Rules | सरकारच्या ‘या’ स्कीममधून तुम्हाला मिळेल 5 लाख रूपयापर्यंतची रक्कम, जाणून घ्या काय आहे नवीन नियम?