Nashik Police-ATC Squad | नाशिक : आरोपींना जामीन मिळवून देणारी टोळी गजाआड, बनावट कागदपत्रांसह चौघांना अटक (Video)

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – Nashik Police-ATC Squad | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Lok Sabha Election 2024) शहर-जिल्ह्यामध्ये विविध पक्षांच्या नेत्यांच्या सभा होत असल्याने या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik) यांच्या आदेशानुसार, शहरातील हॉटेल्स, लॉजेसची तपासणी करीत असताना, विविध गुन्ह्यातील आरोपींना न्यायालयातून जामीन मिळवून देण्यासाठी बोगस कागदपत्रे तयार करुन बोगस जामीनदारांना हजर करुन जामीन मिळवून देणाऱ्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

नाशिकरोड पोलिस ठाण्यातील (Nashik Road Police Station) दहशतवाद विरोधी पथकाने या टोळीला अटक केली आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवदेश नारायण रामाधर उपाध्याय (वय-41, रा. आडगाव), नितीन नाथा महाले (वय-38), अरुण पंजाबराव गरुड (वय-45), सचिन कैलास शिरसाठ (वय-38, सर्व रा. नाशिकरोड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

नाशिक रोड रेल्वे स्टेशनजवळी साई लॉज याठिकाणी दहशतवाद विरोधी पथकाकडून तपासणी सुरु होती. त्यावेळी एका रुममध्ये थांबलेल्या चौघांची चौकशी सुरू होती. त्यावेळी पोलि24सांना त्यांच्याकडील कागदपत्रांवरून संशय आला. त्यामुळे पोलिसानी त्यांची कसून चौकशी करीत त्यांच्याकडील कागदपत्रांची व सामानाची झडती घेतली असता, धक्कादायक कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागले.

आरोपी उपाध्याय याच्याकडे त्याचा स्वत:चा फोटो असलेले वेगवेगळे नाव व क्रमांक असलेले तीन आधारकार्ड तसेच इतर बनावट कागदपत्रे व इतर तीन जणांकडे बनावट रेशनकार्ड, महसुल विभागाचे बनावट शिक्के मिळाले. याबाबत चौकशी केली असता आरोपींनी राकेश बाळु जाधव, प्रमोद प्रल्हाद नार्वेकर, दविद लमूवेल गायकवाड यांच्या मदतीने बनावट कागदपत्रे तयार करुन बोगस जामीनदार नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या न्यायालयात हजर करुन त्याद्वारे वेगवेगळ्या आरोपींचा जामीन करुन घेतल्याचे निष्पन्न झाले.

ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णीक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत,
सहायक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी, नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके,
पोलीस निरीक्षक गुन्हे बडेसाहब नाईकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी,
पोलीस अंमलदार पवार, हेमंत मेढे, राहुल मेहेंदळे, विजय टेंमगर, विष्णु गोसावी, नाना पानसरे, दत्तात्रय वाजे,
संतोष पिंगळ, सागर आडणे, अजय देशमुख, केतन कोकाटे, कल्पेश जाधव, गोकुळ कासार,
रोहित शिंदे, योगेश रानडे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai North Lok Sabha | उत्तर मुंबई मतदारसंघात मराठी-अमराठी हे प्रचारातील मुद्दे गोयल यांच्यासाठी त्रासदायक

Swargate Pune Crime news | खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपीला स्वारगेट पोलिसांकडून अटक

Amit Shah | अमित शहांचा मोठा दावा, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौथ्या टप्प्यातच बहुमत मिळाले’ (Video)