Nashik Police Car Accident | मुंबई-आग्रा महामार्गावर पोलिसांच्या वाहनाला भीषण अपघात, तीन पोलीस कर्मचारी जखमी

नाशिक / इगतपुरी : पोलीसनामा ऑनलाइन – Nashik Police Car Accident | नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाताना पोलिसांच्या वाहनाला विचित्र अपघात झाला. या अपघातत तीन पोलीस जखमी (Policemen Injured) झाले आहे. हा अपघात मुंबई आग्रा महामार्गावरील (Mumbai Agra Highway) इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला औद्योगिक वसाहतीतील (Gonde Dumala Industrial Estate) लिअर कंपनीजवळ झाला. हा अपघात (Nashik Police Car Accident) एवढा भीषण होता की यात पोलिसांच्या वाहनाने तीन पलट्या मारल्या. जखमींना उपचारासाठी वाडीवऱ्हे येथे दाखल करण्यात आले आहे.

सचिन मंडलिक, रश्मी राजपूत गुन्ह्या प्रकरणी हायकोर्टात (High Court) एफिडेविट (Affidavit) सादर करण्यासाठी जात असताना पोलिसांच्या गाडीला अपघात झाला. तीन वाहनांचा हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघात झाल्यानंतर अपघातातील एक वाहन चालक वाहन घेऊन पसार झाला आहे. अपघातात नाशिक पोलीस दलातील संतोष भगवान सौंदाणे Santosh Bhagwan Saundane (वय-57), सचिन परमेश्वर सुक्ले Sachin Parmeshwar Sukle (वय-43), रविंद्र नारायन चौधरी Ravindra Narayan Chaudhary (वय-37) हे जखमी झाले आहेत.

जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेचे निवृत्ती पाटील गुंड यांना अपघाताची माहिती
मिळताच त्यांनी तातडीने अपघात स्थळावर धाव घेतली.
जखमींना वाडीवऱ्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
यात पोलिसांच्या गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच आणखी एका कारचे नुकसान झाले आहे.

Web Title :- Nashik Police Car Accident | strange accident involving a nashik police vehicle near gonde on the highway three policemen injured

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Sanjay Raut | फक्त विरोधकांवरच कारवाई का? मुश्रीफांच्या घरी ईडीच्या कारवाईवरून संजय राऊतांचा सवाल

Hasan Mushrif | माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुणे आणि कागलमधील घरावर ईडीची छापेमारी

Maharashtra Politics | विधानपरिषद उमेदवारी अन् देवेन भारतींच्या नियुक्तीवरून शिंदे गटात नाराजीचा सूर