Nashik Police Crime Branch | नाशिक : बनावट नंबर प्लेट लावून बोलेरो वापरणाऱ्यावर गुन्हे शाखेची कारवाई (Video)

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – Nashik Police Crime Branch | बोलेरो चारचाकी वाहनावर बनावट नंबर टाकून वाहन वापरणाऱ्या व्यक्तीविरुद्ध नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने कारवाई केली आहे. बनावट नंबर प्लेट (Bogus Number Plate) लावणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करुन बोलेरो वाहन जप्त केले आहे. ही कारवाई बुधवारी (दि.10) म्हसरुळ येथील कनसरा माता चौकात (Kansara Mata Chowk Nashik) करण्यात आली.

नाशिक शहरात चोरी होणाऱ्या दुचाकी तसेच चारचाकी वाहनांचा शोध घेऊन चोरी करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याच्या सुचना पोलीस आयुक्त संदिप कर्णीक यांनी गुन्हे शाखेला दिले होते. त्यापार्श्वभूमीवर गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस अधिकारी व कर्मचारी आरोपी व चोरीच्या वाहनांची माहिती काढत होते. त्यावेळी सहायक पोलीस उपनिरीक्षक सुगन साबरे यांना माहिती मिळाली की, म्हसरुळ येथील कनसरा माता चौकातील पुष्कराज अपार्टमेंट येथे एक बोलेरो पिकअप गाडी उभी असून बनावट नंबर प्लेट लावून वापरली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पथकाने पुष्कराज अपार्टमेंट येथे जाऊन पाहिले असता एक पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप गाडी उभी असल्याचे दिसले. या गाडीवर एम.एच. 15 एच.एन 4998 असा क्रमांक दिसून आला. पोलिसांनी माहिती घेतली असता हा क्रमांक बनावट असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी गाडीच्या मुळ चेसिस व इंजिन नंबर वरुन माहिती घेतली असता गाडीचा मुळ क्रमांक टी.एन.22 डी.ए 5014 असून ही गाडी अक्षय शंकर लामखेडे यांच्या नावावर असल्याचे निष्पन्न झाले. पथकाने बोलेरो वाहन जप्त करुन वाहन चालवणाऱ्या व्यक्तीवर म्हसरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच जप्त केलेले वाहन पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त संदिप कर्णीक (Sandeep Karnik IPS), पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. सिताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक गजानन इंगळे, चेतन श्रीवंत, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुगन साबरे, पोलीस अंमलदार रमेश कोळी, देविदास ठाकरे, योगीराज गायकवाड, मिलींदसिंग परदेशी, जगेश्वर बोरसे, चालक समाधान पवार यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : कौटुंबिक कारणावरुन पत्नीला मारहाण, जाब विचारणाऱ्या दोघांवर चाकूने वार; एकाला अटक

Amol Kolhe On BJP Govt | डॉ. अमोल कोल्हे यांनी भाजपावर उगारला टीकेचा ‘आसूड’, केंद्राच्या चुकीच्या धोरणांमुळे कांदा, सोयाबिन, दूध उत्पादक शेतकरी…