राष्ट्रपतींच्या बंदोबस्ताला जाताना पोलिसाचा अपघाती मृत्यू

जळगाव : पोलीसनामा ऑनलान – राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे बुधवार आणि गुरुवार दोन दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिक येथे राष्ट्रपती दौऱ्याच्या बंदोबस्ताला जाताना महेंद्र सिताराम उमाळे (वय-30 रा. निमखेडी शिवार) या पोलीस कर्मचाऱ्याचा रेल्वेतून पडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.10) दुपारी लासलगाव रेल्वे स्थाकाजवळ घडली उमाळे हे शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकात कर्यरत होते.

राष्ट्रपती यांच्या नाशिक दौऱ्यासाठी नाशिक परिमंडळातून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला होता. या बंदोबस्तासाठी महेंद्र उमाळे यांना पाठविण्यात आले होते. बुधवारी जळगाव येथून भुसावळ येथे गेले. तेथून गोदान एक्सप्रेसने जात असताना लासलगाव स्थानकाजवळ तोल गेल्याने ते गाडीतून खाली पडले. त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार रेल्वे ट्रॅकवरील गँगमन यांना समजली त्यांनी रेल्वे पोलिसांना याची माहिती दिली.

रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महेंद्र उमाळे यांच्या ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटली. त्यानंतर ते कार्यरत असलेल्या पोलीस ठाण्यात त्यांच्या मृत्यूची माहिती देण्यात आली. तसेच त्यांच्या नातेवाईकांना मृत्यूची माहिती देण्यात आली. उमाळे हे 2014 पोलीस दलात भरती झाले होते. महेंद्र यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

visit : policenama.com