Nashik-Pune Highway | नाशिक-पुणे महामार्गावरील रस्त्याचं काम अपूर्ण असूनही टोल वसुली; कंपनीला 2 कोटी 18 लाखांचा दंड

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – Nashik-Pune Highway | नाशिक-पुणे महामार्गावरील (Nashik-Pune Highway) शिंदे टोलनाक्याला तब्बल 2 कोटी 18 लाखांचा दंड ठोठावण्यात आला असल्याचं समोर आलं आहे. तेथील महामार्गाचं काम पुर्ण न करता टोलवसुली (Toll collection) सुरू असल्याने टोल कंपनीला दंड सुनावण्यात आला आहे. तर, टोल रद्द करुन कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. रस्त्याचं काम पूर्ण होईपर्यंत येथील टोलवसुली बंद करण्याची मागणी देखील होताना दिसत आहे.

मागील काही काळापासून नाशिक-पुणे महामार्गावरील (Nashik-Pune Highway) शिंदे टोलनाक्यावरील टोलवसुली सुरू होती.
सातत्याने तक्रारी करुन देखील याकडे दुर्लक्ष होत होतं.
या पार्श्वभुमीवर शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे (Shiv Sena MP Hemant Godse) यांनी राष्ट्रीय प्राधिकरणाकडे (National Authority Highways) तक्रार केली.
यानंतर राष्ट्रीय प्राधिकरणानं याची तातडीने दखल घेत टोल नाक्यावर कारवाई केली आहे. यावरून शिंदे टोलनाक्याला कोट्यावधीचा दंड ठोठावण्यात आला आहे.

नाशिक-मुंबई महामार्गावर (Nashik-Pune Highway) असणाऱ्या खड्ड्यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे (Raj Thackeray), पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यासह अनेकांच्या पुढाकाराने रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात आला.
परंतु, या मार्गावरून नेत्यांचा प्रवास तुलनेनं कमी असल्यानं सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे, दंडात्मक कारवाईनंतर तरी टोल वसुली थांबून रस्ता दुरूस्त होणार का? असे प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत.

दरम्यान, अर्धवट रस्त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी होते आणि अपघाताचे प्रमाणही वाढले.
धुळीमुळे आजूबाजूच्या नागरिक, व्यावसायिकांना त्रास होतो.
याबाबत सातत्याने विनंती, सूचना करुन देखील रस्त्याचं काम पूर्ण होत नव्हते.
अखेर शिवसेना खा. हेमंत गोडसे यांनी राष्ट्रीय प्राधिकरणाकडे तक्रार केली.
यानंतर टोलवसुली करणाऱ्या चेतक प्रा. लिमिटेड कंपनीला दंड ठोठावण्यात आला आहे.

हे देखील वाचा

Pune Corporation | पुणे महापालिकेची ‘टॉयलेट’ कथा ! ‘मलिदा’ घेऊन बिल्डरच्या फायद्यासाठी 20 लाख रुपये खर्चून उभारलेले ‘स्वछतागृह’ मध्यरात्री ‘जमीनदोस्त’

ST Workers Agitation | ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढणार ! एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात मनसे मैदानात उतरणार

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Nashik-Pune Highway | toll collection without completing road work toll naka on nashik pune highway fined for 2.18 cr

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update