ACB Trap News | नाशिक सहकरी संस्था जिल्हा उपनिबंधक आणि वकील यांना 30 लाख रुपये लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap News | नाशिक सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक आणि खासगी वकील यांना 30 लाख रुपये लाच घेताना (Accepting Bribe) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Maharashtra) अटक केली आहे. जिल्हा उपनिबंधक सतिश भाऊराव खरे District Deputy Registrar Satish Bhaurao Khare (वय 57 रा. फ्लॅट नंबर 201, आई हाईट्स, कॉलेज रोड, नाशिक) वकील शैलेश सुमतीलाल सुभद्रा Adv. Shailesh Sumatilal Subhadra (वय 32 रा . फ्लॅट नं 4, उर्वी अपार्टमेंट सौभाग्य नगर, गंगापूर रोड, नाशिक) असे लाच घेताना रंगेहाथ (Nashik ACB Trap) पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. ही कारवाई सोमवारी (दि.15) सतिश खरे यांच्या घरी करण्यात आली. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ (ACB Trap News) उडाली आहे.

याबाबत 40 वर्षाच्या व्यक्तीने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB Trap News) तक्रार केली आहे. तक्रारदार हे नुकतेच नाशिक जिल्ह्यातील एका कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये (Krushi Utpanna Bazar Samiti Election) संचालक पदी कायदेशीर पद्धतीने व वैधपणे म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्या निवडीविरुद्ध प्रकरण दाखल झाले आहे. या प्रकरणावर सुनावणी घेऊन ती सुनावणी तक्रारदार यांच्या बाजूने देण्यासाठी सतिश खरे यांनी लाच मागितली. तर अॅड. शैलेश सुभद्रा यांनी तक्रारदार यांना लाचेची 30 लाख रुपये रक्कम खरे यांच्या घरी घेऊन येण्यास सांगितले. दरम्यान तक्रारदार यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.

नाशिक एसीबीने पंचासमक्ष पडताळणी केली असता, तक्रारदार यांच्या निवडीविरुद्ध दाखल प्रकरणावर सुनावणी घेऊन निकाल तक्रारदार यांच्या बाजून देण्यासाठी सतिश खरे यांनी स्वत: साठी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तसेच अॅड. शैलेश सुभद्रा यांनी लाचेची 30 लाख रुपयांची रक्कम खरे यांच्या घरी स्विकारण्याचे मान्य केले. त्यानुसार पथकाने सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून 30 लाख रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (SP Sharmistha Gharge-Walawalkar),
अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे (Addl SP Narayan Nyahalde) पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार
(DySP Narendra Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक अभिषेक पाटील
(DySP Abhishek Patil), सहायक पोलीस उप निरीक्षक सुकदेव मुरकुटे (ASI Sukdev Murkute)
पोलीस अंमलदार मनोज पाटील, अजय गरुड यांच्या पथकाने केली.

Web Title :- Nashik Sahakari Sanstha district deputy registrar and lawyer arrested by anti-corruption for taking Rs 30 lakh bribe

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | खडकवासल्यातून बचावलेल्या सात वर्षांच्या कुमुदला पडली ऑक्सिजनची गरज

Gulabrao Patil | मी एकट्यानं उद्धव ठाकरेंसोबत राहून काय केलं असतं?, गद्दारीच्या आरोपांवर गुलाबराव पाटलांचे स्पष्टीकरण

Chandrashekhar Bawankule | कर्नाटक निकालानंतर भाजप सावध, लोकसभेसाठी बावनकुळेंनी सांगितला मास्टर प्लान (व्हिडिओ)