चक्कर आली अन् झाला 11 जणांचा मृत्यू तेही एकाच दिवसात; नाशिकमध्ये खळबळ

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना व्हायरसचे भीषण संकट आहे. या संकटापासून अद्याप राज्य बाहेर पडला नाही. पण आता नाशिकमध्ये एक धक्कादायक बाब घडली आहे. शहरात चक्क आल्याने एकाच दिवसात तब्बल 11 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आधीच कोरोनामुळे चिंतेत असलेले नागरिक आता अशाप्रकाराने आणनीच भयभीत झाले आहेत.

नाशिकमध्ये मृत्यू झालेल्या यातील काहींना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. तसेच त्यांच्या छातीत कळाही मारत होत्या. मात्र, त्यानंतर आलेल्या चक्करनंतर या 11 जणांचा मृत्यू झाला. हे सर्व लोक त्यांच्याच घरात होते. नाशिकमध्ये अशाप्रकारे मृत्यू पावलेल्यांची संख्या 24 वर गेली आहे. या घटनेनंतर आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली असून, या सर्वांच्या मृत्यू कारण शोधले जात आहे. यापूर्वी 15 एप्रिललाही अशीच घटना घडली होती. यादिवशी नाशिक शहरात 9 जणांचा मृत्यू झाला होता. तसेच आणखी 4 जणांचाही अशाप्रकारे चक्कर आल्याने मृत्यू झाला होता. त्यामुळे आत्तापर्यंत 24 जणांचा अशाप्रकारे मृत्यू झाला आहे.

कारण शोधण्याचा प्रशासनाचा प्रयत्न

मळमळ होणे किंवा चक्कर येणे यांसारखा काहीही त्रास होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये, असा सल्ला नाशिकमधील वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. या मृत्यूमागे वाढते तापमान हे कारण आहे की आणखी काही याचे कारण शोधण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न केला जात आहे.