IPS अधिकारी आणि नाशिकच्या महिला पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी धरला ‘झिंगाट’ गाण्यावर ठेका (व्हिडीओ)

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – महिला पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी झिंगाट गाण्यावर ठेका धरत डान्स केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात रंगपंचमी खेळण्यात आली होती. यावेळी गाणी लावण्यात आली होती. याच आनंदात महिला पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी झिंगाट गाण्यावर ठेका धरला.

पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या तुफान डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रंगपंचमीच्या निमित्तानं सर्व महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी झिंगाट गाण्यावर मनसोक्त डान्स केला. कामाचा ताण आणि थकवा विसरून मोठ्या उत्साहात ह्या सर्वांमध्ये झिंगाट गाण्यावर डान्स करताना पहायला मिळाल्या आहेत. कामाच्या व्यापातून आणि कामाचा ताण असतानाही त्यांनी काही काळ महिला पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसोबत डान्स केला आहे. पोलिसांच्या वर्दीतील डान्सचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

डॉ. आरती सिंह या नाशिक जिल्ह्याच्या पहिल्या महिला पोलीस अधीक्षक आहेत. त्यांनी यापूर्वी औरंगाबाद ग्रामीणच्या अधीक्षक म्हणून कार्यभार सांभाळला आहे. नाशिक जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत संजय दराडे यांना पोलीस उपमहानिरीक्षक विक्रीकर मुंबई या पदावर बढती देण्यात आली. त्यांच्या जागी सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.