मोदींसारखी पारदर्शकता राज्य सरकारकडे नाही, देवेंद्र फडणवीसांचा ‘घणाघात’

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रात आखलेल्या सर्व योजनांमध्ये पारदर्शकता आहे. त्या योजनांमध्ये कोणत्याही अटी शर्ती नाहीत. मात्र, सात बारा कोरा करून सरसकट कर्ज माफी देऊ असे सांगणाऱ्या महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना अटी शर्ती लादून फसवणूक केल्याची घणाघाती टीका माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (रविवार) नाशिकमध्ये केली.

आयुष्यमान भारत योजने अंतर्गत पाच हजार कार्डाचे वितरण नाशिकमध्ये करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आयुष्यमान भारत ही अत्यंत पारदर्शी योजना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वच योजना अशाच पारदर्शी असतात. त्यात अटी शर्ती नसतात. मात्र, राज्यातील सरकारने एक लाख रुपयांत बंगला आणि खाली अटी शर्ती लागू अशा स्वरुपाच्या योजना करु लागले आहेत.

निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी देऊ, सात बारा कोरा करु असे आश्वासन दिले होते. मात्र, सत्ता आल्यानंतर अटी शर्ती लादण्यात आल्या. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाली नाही. आमचे सरकार सत्तेवर असताना त्यावेळी शेतकऱ्यांना आधार लिंक करण्यास सांगितले, त्यामुळे कर्ज माफीचा लाभ मिळाला नाही असे सांगितले गेले. मात्र आता जीआर बघा, प्रत्यक्ष आपले सरकार केंद्रात जाऊन आपल्या नावावर किती नुकसान आहे, ते बघा, ते मान्य असेल तर अपलोड करा अशा अर्टी शर्ती लागू केल्या आहेत. त्यामुळे ही कर्जमाफी फसवी असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.
मराठी माणूस मराठी माणसाबरोबरच
बेळगाव मधील मराठी माणसाच्या प्रश्नावर त्यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी मराठी माणूस हा मराठी माणसाबरोबरच राहील असे स्पष्ट केले. नाशिकमध्ये निओ मेट्रो रद्द करण्यासाठी घालण्यात आलेला घाट दुर्दैवी आहे. योजनेविषयी शंका असतील तर त्या समजावून घ्या परंतु नाशिककरांचे नुकसान करु नका असेही त्यांनी यावेळी म्हटले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/