तुझा विषय मीच ‘क्लोज’ करेन, वाहतूक पोलिसाच्या गुंडगिरीचा ‘VIDEO’ व्हायरल

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – वाहतुकीला शिस्त लावण्याचे काम करणाऱ्या वाहतूक पोलिसांकडून नागरिकांवर अरेरावी करण्यात येत असल्याची अनेक प्रकरणे वाचली असतील. वाहन चालकांवर कायदेशीर कारवाई करण्याऐवजी त्यांना शिवीगाळ करून मारहाण देखील करण्यात येते. तसेच याचा व्हिडीओ काढताना दिसून आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली जाते. नाशिक शहर वाहतूक पोलिसाच्या गुंडगिरीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये वाहतूक पोलिसाने व्हिडीओ काढणाऱ्या व्यक्तीला चक्क धमकीच दिली आहे. तुझा विषय मीच क्लोज करेन अशा भाषेत वाहतूक पोलिसाने धमकी देत माझे नाव लक्षात ठेव अशी उर्मट भाषा वापरून गुंडगिरी केल्याचे दिसून येत आहे. या मुजोर पोलीस कर्मचाऱ्यावर कारावाई करण्याची मागणी नाशिककरांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे.

 

नाशिक शहर वाहतूक पोलिसाचा गुंडगिरीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे. या पोलीस कर्मचाऱ्याकडून वाहनधारकाला शिवीगाळ आणि मारहाण केल्याचं सांगितलं जात आहे. या वाहतूक पोलिसाचं नाव राजाभाऊ गांगुर्डे असं असून त्याविरोधात पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण केला तर पोलीस संबंधीत व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करतात. मग पोलिसच जर नागरिकांशी अशा प्रकारे वागले तर काय कारवाई करणार अशी विचारणा केली जात आहे. या पोलीस कर्मचाऱ्यावर पोलीस अधिकारी कारवाई करतात की त्याला पाठिशी घालतात हेच पहावे लागेल.

 

Loading...
You might also like