शीत पेयातून गुंगीचे औषध देऊन तरुणीवर लैंगिक अत्याचार

नाशिकरोड : पोलीसनामा ऑनलाईन –   मॉडेलिंगमध्ये करिअरच्या भूलथापा देत एकाने तरुणीला गुंगीचे औषध देऊन वेळोवेळी तिच्यावर अत्याचार (woman-sexually-assaulted-on-pretext-of-career-in-modeling) केला. तसेच अश्लील व्हिडीओ काढून व्हायरल करण्याची धमकी देत पैसे व सोन्याचे दागिनेही लुबाडल्याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आफताब मन्नन शेख असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पीडीत तरुणीने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडीत तरुणी 2012 मध्ये ती बारावीत असताना वडनेर गेट येथील संस्थेमध्ये मॉडेलिंग ट्रेनिंगसाठी जात होती. तेथे एकाने विकी शर्मा असे नाव सांगून आपली मॉडेलिंगमध्ये चांगली ओळख असल्याचे सांगत मॉडेलिंगचे ट्रेनिंग सुरू केले. मॉडेलिंगसाठी फोटो शूट करण्यासाठी तो तिला बाहेर घेऊन जात असत. ऑगस्ट 2012 मध्ये फोटो शूटचे कारण सांगून पीडितेस घरी नेऊन कोल्ड ड्रिंक्समधून गुंगीचे औषध दिले. तिची शुद्ध हरपल्यावर तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. संबंधिताचे नाव विकी शर्मा नसून, आफताब मन्नन शेख असल्याचे तरुणीला नंतर समजले. मोठ्या बहिणीचे लग्न झाले होते, तर दुसऱ्या बहिणीचे लग्न ठरल्याने पीडित तरुणी गप्प बसली होती. मात्र, संशयित आफताबने व्हिडीओ, फोटो व्हायरल करेन, घरच्यांना ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार सुरूच ठेवले. तिच्याकडून आठ लाख रुपये, सोन्याचे दागिने घेतले. तिची शैक्षणिक कागदपत्रे, पॅन, आधार कार्ड, वाहन परवाना, एटीएम कार्ड, पासपोर्ट आदीदेखील घेतले. ऑगस्ट 2012 ते फेब्रुवारी 2020 पर्यंत आफताबने अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

You might also like