‘नाशिक चा मी आशिक’ गाण्याचा टीझर सोशल मीडियावर लोकप्रिय

मुंबई : पोलीसनामा आॅनलाइन – सोशल मीडियावर ‘नाशिकचा मी आशिक’  या गाण्याच्या टीझरला तुफान लोकप्रियता मिळत आहे. आतापर्यंत या व्हिडिओला ६८ हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे. हे गाणं प्रसिद्ध गायक प्रवीण कुवर आणि हर्षवर्धन वावरे यांनी गायले आहे. या गाण्याचे दिग्दर्शन प्रसाद आप्पा तारकर यांनी केले आहे. गाण्याच्या ओळींवरूनच हे गाणे नाशिककरांच्या मनाचा ठाव घेणार आहे हे समजून येते. संगीतकार प्रवीण कुवर यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहं. तर हे गाणं अवधूत वाडकर यांनी ध्वनिमुद्रित केलं आहे. नाशिकच्या भव्यतेचा तसेच निसर्ग सौंदर्याचा विचार करूनच या गाण्याची रचना केली असल्याचे गीतकार मंदार चोळकर सांगतात.
केतन भाई सोमैय्या आणि जय केतन भाई सोमैय्या यांनी या गाण्याची निर्मिती केली आहे. महाराष्ट्रातील नाशिक हा जिल्हा बर्‍याच गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. नाशिकमधील पर्यटन स्थळे, दक्षिणोत्तर वाहणारी गंगा, मंदिरांचे कळस, डोंगर दऱ्यांची नक्षी आणि निसर्गरम्य परिसर. आता याच नाशिकला जगाच्या नकाशावर प्रामुख्याने महाराष्ट्राच्या नकाशावर आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी निर्माता केतनभाई सोमैया यांचे ‘नाशिकचा मी अशिक’ हे नाशिकची गाथा सांगणारे नवीन गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या गाण्यामध्ये प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे, बिग बॉस फेम स्मिता गोंदकर तसेच काहे दिया परदेस फेम सायली संजीव, अभिनेत्री मयुरी शुभानंद आणि नाशिकचे कलाकार या गाण्यात झळकणार आहेत. प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन करणार असून लवकरच नाशिक येथेच या गाण्याच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे. या गाण्याच्या टीझरला इतका चांगला प्रतिसाद मिळतो आहे तर या गाण्याला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात, हे पाहावे लागेल.

जलयुक्त शिवार योजनेत ‘हा’ जिल्हा प्रथम क्रमांकावर