5000ची लाच मागणारा आश्रमशाळेचा मुख्याध्यापक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – सातव्या वेतन आयोगाच्या फरकाच्या बिलाचा प्रस्ताव आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात पाठवण्यासाठी 5 हजार रुपयाची लाच मागितल्याप्रकरणी आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिलिंद जगन्नाथ घाटकर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. घाटकर हा नाशिक जिल्ह्यातील त्रंबकेश्वर तालुक्यातील वेळुंजे आश्रम शाळेत कार्यरत आहे.

तक्रारदार हे नाशिक एज्युकेश सोसायटी संचलित वेळुंजे आश्रमशाळेत कार्यरत आहेत. त्यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या फरकाच्या बिलाचे प्रस्ताव आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात पाठवून मंजूर करण्यासाठी घाटकर याने पाच हजार रुपयाची लाच मागितली. तक्रारदार यांनी 29 नोव्हेंबर 2019 रोजी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या पडताळणीमध्ये मिलिंद घाटकर याने तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार घाटकर याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार त्रंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

मधुमेह असल्यास आहारामध्ये करा ‘या’ ४ पदार्थांचा समावेश
‘हे’ ७ उपाय केल्यास सतत येणारा थकवा जाईल पळून, जाणून घ्या
जेवण पॅक करण्यासाठी ‘फॉईल पेपर’ वापरता ? ‘हे’ ७ दुष्परिणाम जाणून घ्या
मासिक पाळीत स्वच्छता राखण्यासाठी ‘या’ ६ गोष्टी लक्षात ठेवा !
गूळ खाण्याने वाढते वजन, जास्त खाण्याचे ‘हे’ ६ तोटे जाणून घ्या
मातेच्या स्तनपानामुळे बाळांना होतात ‘हे’ ६ फायदे, जाणून घ्या
लवंग खाण्याचे ‘हे’ ६ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?