एलसीबीकडून गावठी पिस्तुल बाळगणार्‍याला अटक

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) गावठी पिस्तुल बाळगणार्‍याला मालेगाव शहरातील मनमाड चौफुली परिसरातुन अटक केली. त्याच्याकडुन पिस्तुलासह 7 जिवंत काडतुसे आणि 2 मॅगझिन जप्‍त करण्यात आली आहेत.
मंजुर हेसन मुज्जफर हुसेन (34, रा. गुलशने मालीक, सर्व्हे नं. 107, मालेगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. दि. 11 नोव्हेंबर रोजी एलसीबीचे अधिकारी व कर्मचारी मालेगाव शहरात सराईत गुन्हेगारांचा शोध घेत असताना त्यांना आरोपीबाबत खबर्‍यामार्फत माहिती मिळाली. पोलिस पथकाने मिळालेल्या माहितीची खातरजमा केली.
पोलिस अधीक्षक संजय दरोडे, अप्पर अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अशोक करपे, सहाय्यक उपनिरीक्षक सुनिल आहिरे, हवालदार राजु मोरे, वसंत महाले, सुहास छत्रे, राकेश उबाळे, देवा गोविंद, कर्मचारी फिरोज पठाण आणि रतिलाल वाघ यांच्या पथकाने आरोपीला सापळा रचुन अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तुल, 7 जिवंत काडतुसे आणि 2 मॅगझिन तसेच गुन्हयात वापरलेली होन्डा शाईन मोटारसायकल जप्‍त करण्यात आली आहे.
आरोपीविरूध्द मालेगाव किल्‍ला पोलिस ठाण्यात आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एलसीबीने गेल्या आठवडयाभरात अग्‍नीशस्त्रे बाळगणार्‍या एकुण 6 जणांना अटक केली असुन त्यांच्याकडून 4 देशी बनावटीचे पिस्तुले, 12 जिवंत काडतुसे, 5 मॅगझिन, 2 मोटारसायकली आणि एक स्विफ्ट कार एवढे मुद्देमाल जप्‍त केला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us