सलमान खानचा जबरा फॅन नाशिकमध्ये ; ‘भारत’ पाहण्यासाठी केलं असं काही की तुम्ही देखील तोंडात बोट घालाल

नाशिक : पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्यांवर जीवापाड प्रेम करणारे चाहते नेहमीच आढळून येतात. हे प्रेम व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना वापरतात. अशीच एक कल्पना सलमानच्या चाहत्याने वापरली आहे. अभिनेता सलमान खानचा भारत हा चित्रपट येत्या बुधवारी प्रदर्शित होणार आहे. सलमान खानचा हा चित्रपट पाहण्यासाठी एका चाहत्याने संपूर्ण थिएटरच बुक केलं आहे. आशिष सिंघल असं या चाहत्याचे नाव असून तो नाशिकचा आहे. भारत चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच चित्रपटातील गाणी चाहत्यांच्या पसंतीला उतरली आहेत.

आशिष हा सलमानचा मोठा चाहता असून तो सलमानचे सर्व चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी पहिल्याच शोला पाहतो. आशिषने सलमानचा भारत हा चित्रपट पाहण्यासाठी नाशिकच्या कॉलेज रोडवरील पीव्हीआर हे संपूर्ण थिएटरच बुक केलं आहे. सलमानचा चित्रपट पाहण्यासाठी आशिष मित्रांना वाजत गाजत थिएटरला घेऊन जातो. सलमानला भेटण्याची आशीषची खूप इच्छा आहे, सलमानची भेट झाल्यास तो आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण असेल अशी भावना आशिषने व्यक्त केली.

सलमानचा चित्रपट जेव्हा प्रदर्शित होतो तेव्हा सलमानचे अनेक चाहते त्याचा चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करतात. असे मोठे चित्रपट जेव्हा प्रदर्शित होतात तेव्हा तिकिटांच्या दरात वाढ केली जाते. भारत चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तिकिटाच्या दरात कोणतीही वाढ केली जाणार नाही, असे अभिनेता सलमान खानने स्पष्ट केले आहे. ‘भारत’ चित्रपटात सलमान खान सहा भूमिकांमध्ये दिसणार आहे. सलमान ६० वर्षीय व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात कतरीना, जॅकी श्रॉफ , दिशा पटानी, सुनील ग्रोव्हर इत्यादी कलाकार झळकणार आहेत.