Coronavirus : नाशिकच्या SP आरती सिंह यांचा ‘डबल रोल’ !

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून राज्यातील नागरिकांची सुरक्षा करण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. जिवघेण्या विषाणूपासून नागरिकांचे संरक्षण व्हावे यासाठी नागरिकांनी घरा बाहेर पडू नये यासाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घरदार सोडून रस्त्यावर चोवीस तास कर्तव्य बजावत आहेत. या पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नाशिकच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह या मैदानात उतरल्या आहे. पोलीस कर्तव्य बजावत त्या आपल्या सहकार्यांच्या आरोग्याची काळजी घते आहेत.

लॉकडाऊन दरम्यान 15 तासांपेक्षा जास्त ड्युटी असतानाही शहरातील पोलिसांना आरोग्याबाबत काहीही चिंता नाही. कारण कॅप्टन आरती सिंह ह्या स्वत: एक डॉक्टर देखील आहेत. त्या केवळ कायदा व सुव्यवस्थाच नाही तर त्यांच्या कार्यसंघाच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. आपल्या संपूर्ण टीमला एसपी आरी यांनी स्पष्टपणे निर्देश दिले आहेत, जर रोगाची कोणतीही लक्षणे दिसली तर घाबरू नका, सगळ्यात आधी मला कॉल करा.

प्रत्यक्षात डॉ. आरती सिंह यांना 15 तास कर्तव्य बजावण्याऱ्यांविषयी अधिक काळजी आहे. मीटिंग्ज आणि वॉकी-टॉकीजमध्ये त्या सतत आरोग्याबद्दल टीमला विचारत आहेत. तसेच पोलीस कॉलनीत जाऊन महिला व मुलाशी संवाद साधत आहेत. त्यांना सामाजिक अंतर दूर करणे, घराबाहेर पडू नये, कर्तव्यावर असणाऱ्य़ा पोलिसांचा आहार याविषयी त्या सल्ला देत आहेत. डॉ आरती यूपीच्या मिर्झापूरच्या आहेत. एमबीबएसनंतर त्यांनी वाराणसीच्या सरकाही रुग्णालयातही काम केलं. 2004 मध्ये दुसऱ्या प्रयत्नात यूपीएसी पास करून त्या आयपीएस झाल्या.