घरी बसून हार्दिकला चियर करतेय नताशा, मुलासह निळ्या ड्रेसमध्ये शेयर केला फोटो

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : नताशा स्टॅनकोविक सध्या आपल्या मुलासह घरी आहे, तर तिचा मंगेतर क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आयपीएल 2020 साठी दुबईमध्ये आहे. जरी दोघे एकमेकांपासून लांब आहेत, परंतु नताशा आपल्या लहान मुलासह हार्दिकचे मनोबल वाढविण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाही. घरातील छायाचित्रांद्वारे ती हार्दिक आणि त्याच्या टीमला चियर करीत आहे. नताशाने आपल्या मुलाला हातात घेत फोटो शेअर केले आहेत, त्यामध्ये ते दोघे मुंबई इंडियन्सच्या ड्रेस कलर कोडशी मॅच करणाऱ्या निळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये दिसत आहे. नताशाने त्या फोटोसोबत हार्दिक पंड्या, कुणाल पंड्या आणि त्यांची टीम मुंबई इंडियन्सला टॅग केले.

नताशाचा हा सिंपल वे ऑफ एक्सप्रेशन हार्दिक आणि त्याच्या टीमसाठी विशेष होता. यावर मुंबई इंडियन्सच्या संघानेही प्रतिक्रिया दिली आहे. नताशाशिवाय हार्दिकचा भाऊ वैभव पंड्यानेही आपल्या दोन्ही भावांना प्रोत्साहन दिले आहे. त्याने इन्स्टाग्राम स्टोरीवर कुटुंबियांसह लाईव्हचॅट करत व्हिडिओ शेअर केला आहे. यासोबतच नताशाने ब्लू जर्सी परिधान केलेले फोटोही इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत.

आपल्या मुलाच्या जन्मानंतर काही दिवसांनी आयपीएलच्या तयारीसाठी हार्दिक भारताहुन दुबईसाठी रवाना झाला. अशा परिस्थितीत नताशा गेल्या दोन महिन्यांपासून घरी एकटी होती. हार्दिकची आठवण काढताना नताशाने फोटोही शेअर केले आहेत. नुकतेच अभिनेत्रीने स्विमिंग पूलमध्ये रिलॅक्स करतानाचा दोघांचा फोटो शेअर केला आहे.

हार्दिकदेखील नताशा आणि आपल्या मूलाला खूप मिस करतो. काही काळापूर्वी त्याने तिघांच्या ऑनलाइन व्हिडीओ कॉलचा स्क्रीनशॉट शेअर केला होता. ज्यात त्याचा मुलगा देखील दिसला आहे. हार्दिक आणि नताशाने आपल्या मुलाचे नाव अगस्त्य ठेवले आहे. दोघांनाही यावर्षी न्यू इयरला ऐंगेजमेंट केली होती. त्याने दुबईहून ऐंगेजमेंटचे फोटो शेअर करुन सर्वांना चकित केले. काही महिन्यानंतर प्रेग्नन्सीची बातमी जाहीर करत त्याने पुन्हा चाहत्यांना सरप्राईज केले. त्याच्या आनंदात त्याचे मित्र, कुटुंब आणि चाहते सर्व सहभागी झाले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like