पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवू़डमध्ये आपल्या हॉटनेसमुळं धुमाकूळ घालणारी अभिनेत्री नताशा स्टानकोविक गेल्या अनेक दिवसांपासून टीम इंडियाचा ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पंड्यासोबतच्या लव लाईफमुळं चर्चेत आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच नताशाला सरप्राईज देत हार्दिकनं तिला समुद्रात बोटीवर रोमँटीक अंदाजात लग्नासाठी प्रपोज केलं आणि तिला रिंग घालत साखरपुडा केला. त्यावेळी त्यांचे फोटो खूप व्हायरल झाले होते. त्यांचा किस करतानाचा व्हिडीओदेखील समोर आला होता. अलीकडेच तिनं वुमेन्स डे ला शेअर केलेले काही फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.
नताशानं शेअर केलेल फोटो सध्या चर्चेत आली आहे. नताशा नेहमीच आपले बोल्ड आणि हॉट फोटो सोशलवर शेअर करत असते. याआधीही तिनं शेअर केलेले बिकीनीतील फोटो प्रचंड व्हायरल झाले होते. चाहतेही तिच्या हॉटनेसचे दीवाने आहेत. नताशा एक सर्बियन मॉडेल आहे.
नताशाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर डायरेक्टर प्रकाश झा यांच्या सत्याग्रह या सिनेमातून तिने बॉलिवूड डेब्यू केला होता. या सिनेमात तिचं आयटम साँग होतं. अय्यो जी असं या गाण्याचं नाव आहे. बिग बॉसच्या सीजन 8 मध्येही नताशा दिसली होती. फेमस सिंगर बादशाह याच्या डीजे वाले बाबू या गाण्यानं नताशाला खूप लोकप्रियता मिळाली होती. शाहरुखच्या झिरो सिनेमातही तिने छोटा रोल करत अभिनयाची झलक दाखवली आहे. नकुतीच नताशा नच बलिए 9 मध्ये तिचा एक्स बॉयफ्रेंड एली गोनी सोबत दिसली होती.