Video : हार्दिक पांड्याला KISS करताना नताशा स्टेन्कोविकचा सोशल मीडियावर फोटो व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   अनेक वेळा चर्चेत असणारा इंडियन क्रिकेट टीमचा ऑलराउंडर हार्दिक पांड्या आणि मॉडेल नताशा स्टेन्कोविक या दोघांची जोडी कायम चर्चेत असते. तर हार्दिक पांड्या आणि नताशा हे दोघेही दररोज आपले व्हिडिओ आणि फोटो समाज माध्यमावर प्रसारित करत असतात. तर आता मात्र नताशाने हार्दिक पांड्याला गालावर किस देत हा एक फोटो पोस्ट केला आहे.

तर नताशाने शुक्रवारी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर करत केला आहे. यामध्ये ती हार्दिक पंड्यासोबत स्विमिंग पूलमध्ये दिसतेय आणि पंड्याच्या गालावर किस देते. तसेच, नताशा स्टेन्कोविकने या फोटोबरोबर लिहिले आहे, की, ‘माझे सनशाईन हार्दिक पांड्या.’ दरम्यान, नताशाने नुकताच आपला जन्मदिन साजरा केला. तर यावरून हार्दिक पांड्याने सोशल मीडियावर पोस्ट केले की, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा माय बेबी. वाढदिवस तुझा आहे परंतु मला वाटते तू मला अगस्त्यच्या रुपात सर्वात चांगली भेट दिली आहे.असे हार्दिक पांड्याने म्हटले होते.

मात्र, हार्दिक पांड्याच्या पत्नीने ३० सप्टेंबर, २०२० ला मुलाला जन्म दिला होता. नताशा स्टँकोव्हिच ही सर्बियन मॉडल आहे. नताशाला २०१० मध्ये ‘मिस स्पोर्ट्स ऑफ सर्बिया’हा अवॉर्ड मिळवला होता. २०१२ रोजी जाहिरातींच्या माध्यमातून नताशाने बॉलिवूडमध्ये पाय टाकलं. रॉपर बादशाहाच्या डीजे वाले बाबू या अल्बममध्ये नताशा दिसली होती. नताशाने १७ वर्ष बॅले डान्स प्रकाराचं प्रशिक्षणही घेतलं आहे.